आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस कल्याण निधीसाठी पोलिस करताहेत तिकिटांची बळजबरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - पोलिस दलातर्फे ते फेब्रुवारीदरम्यान ‘साज और आवाज’ नावाचा ऑर्क्रेस्ट्रा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील ३५ पोलिस ठाण्यांना मिळून सुमारे कोटी रुपयांच्या तिकीट विक्रीचे टारगेट देण्यात आले आहे. हे टारगेट पूर्ण करण्यासाठी पोलिस नागरिकांना जबरदस्तीने ितकीट विक्री करत असल्याची लेखी तक्रार एका पीिडत नागरिकांनी ‘दिव्य मराठी’कडे केली आहे.

पोलिस दलातर्फे दरवर्षी पोलिस कल्याण निधीसाठी कार्यक्रम घेतले जातात, प्रत्यक्षात मात्र या निधीचा विनियोग पोलिस कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी होत नाही. त्यामुळे सामान्य पोलिस कर्मचाऱ्यांच्या नावाने गोळा होणाऱ्या निधीतून त्यांच्यासाठी फार थोड्या प्रमाणातच खर्च होतो, इतर खर्चाचा मात्र हिशेबही ठेवला जात नाही, अशी ही तक्रार आहे.
पोलिस दलाने घेतलेल्या या कार्यक्रमाची जबाबदारी एखाद्या सामाजिक किंवा सांस्कृतिक संस्थेला द्यावी. जेणेकरून त्याचे नियोजन तिकीट विक्रीच्या व्यवहारात पारदर्शकता राहील. पोलिस ठाण्यांना टारगेट दिल्यामुळे जबरदस्तीने तिकिटांची विक्री होत आहे.