आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवीन पोलिसांचा मुक्काम चक्क खरेदी विक्री संघात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यावल - येथील पोलिस वसाहतीच्या दुरुस्तीचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. त्यामुळे नव्यानेच रुजू झालेल्या काही कर्मचा-यांनी रहिवासासाठी चक्क खरेदी विक्री संघाच्या सभागृहाचा आसरा घेतला आहे. यामुळे कायदा सुव्यवस्थेसाठी झटणा-या पोलिसांच्या निवासाचा प्रश्न सुटणार कधी? निवासस्थाने दुरुस्तीच्या कोटी २० लाखांच्या प्रस्तावाला मंजुरी मिळणार कधी? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

यावल पोलिस स्टेशनला लागूनच शासनाची हजार ३९६ चौरस मीटर जागा आहे. त्या जागेवर सन १९८३/८४मध्ये तीन मजली पोलिस वसाहत उभारण्यात आली होती. मात्र, दोन वर्षांपूर्वी इमारत रहिवासायोग्य नसल्याचा निष्कर्ष काढून ऐन पावसाळ्यात तिला खाली करण्यात आले होते. यानंतर ३० ऑक्टोबर २०१४ रोजी यावल भेटीला आलेले पोलिस उपअधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता रमाकांत सुरवाडे यांच्यासोबत पाहणी केली होती. या पाहणीचे फलित म्हणून जानेवारी २०१५मध्ये पोलिस वसाहत दुरुस्तीसाठी कोटी २० लाखांचा प्रस्ताव शासनाकडे रवाना झाला होता.

Ãनवीन कर्मचा-यांना निवासाकरिता अडचण आहे. यामुळे पोलिसांच्या वनिंतीवरून त्यांना सर्व संचालकाच्या परवानगीने खरेदी विक्री संघांच्या सभागृहात निवास व्यवस्था करून दिली. प्रभाकरसोनवणे, संचालक, खरेदी विक्री संघ, यावल

वरिष्ठांकडे पाठपुरावा सुरू
यावल मधीलवसाहतीच्या दुरुस्तीसंदर्भात पोलिस अधीक्षकांकडे सार्वजनिक बांधकामच्या अधिका-यांसोबत बैठक झाली होती. निधीसाठी पाठपुरावा सुरू आहे. प्रश्न सुटेल. नंदकुमारठाकूर, पोलिस उपअधीक्षक, जळगाव

३६ऐवजी १८ खोल्या होणार
या३६ खोल्यांचे १८ खोल्यांमध्ये रूपांतर केल्यानंतर नव्याने शौचालये, स्नानगृह, खिडक्या, दरवाजे, झरोके लावण्यात येतील. इमारतीला रंगरंगोटी करून सुसज्ज करण्यात येईल.

प्रस्तावित दुरुस्ती अशी
दुरुस्तीप्रस्तावानुसार पोलिस वसाहतीमध्ये असलेल्या ३६ खोल्यांचा विस्तार करण्यात येईल. पूर्वी १० बाय आणि १० बाय या लहान खोल्यांचे एकत्रीकरण करून ३६ खाेल्यांचे १८ खोल्यांमध्ये रूपांतर करण्यात येईल.

इमारत जुनी, पाया मजबूत
सन१९८३/८४मध्ये उभारलेल्या इमारतीचा पाया अजूनही भक्कम आहे. नूतनीकरण केल्यानंतर तिचा पुन्हा वापर सुरू होईल. मात्र, कोटी २० लाखांचा निधी उपलब्ध झाला तरच हे शक्य आहे.