आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Police Superintendent Warn Marriage Ceremony Hall Owners

मंगल कार्यालयांच्या मालकांना पोलिस अधीक्षकांची तंबी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - मंगल कार्यालय मालकांनी लग्नकार्यासाठी येणाऱ्या वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करावी; नाही तर मंगल कार्यालयमालकांवरच कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांनी दिला.

शनिवारी पोलिस मुख्यालयातील मंगलम् सभागृहात झालेल्या मंगल कार्यालय आणि बॅण्डमालकांच्या बैठकीत ते बोलत होते. या वेळी पोलिस निरीक्षक नवलनाथ तांबे, श्याम तरवाडकर, चंद्रकांत सरोदे, सूर्यकांत पाटील यांच्यासह मंगल कार्यालय बॅण्डचे मालक उपस्थित होते.

मंगल कार्यालयाच्या हॉल परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवा, तसेच सर्व मंगल कार्यालयांमध्ये सुरक्षा रक्षक नेमण्यात यावे. मंगल कार्यालयांच्या बाहेर रस्त्यावर वाहने उभी केली जातात. परिणामी, वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत असतो. त्यासाठी वेगळी पार्किंग व्यवस्था करणे गरजेचे असल्याचे डॉ.सुपेकर यांनी सांगितले.

‘सायलेंट झोन’मध्ये बॅण्ड वाजवू नका
‘सायलेंट झोन’मध्ये बॅण्ड वाजवण्यास मनाई आहे. त्यामुळे बॅण्डमालकांनी न्यायालय परिसर, शाळा, महाविद्यालये आणि रुग्णालयांजवळ बॅण्ड वाजवू नये; तसे केल्यास न्यायालयाच्या निर्देशानुसार कारवाई केली जाईल. तसेच रात्री १० नंतर वाद्य वाजवू नये, असेही बैठकीत सांगितले.