आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात फिरणाऱ्या स्टायलिश तरुणींवर पोलिसांचा संशय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - लहानमुलांच्या संस्थेसाठी सुरुवातीला मदत मागण्याचे नाटक करत नागरिकांना गंडा घालणाऱ्या राजस्थानातील तरुणी सध्या शहरात फिरत अाहेत. अंगातजिन्स पँट, टाॅप अाणि पायात स्पाेर्ट््स शूज असा स्टायलिश पेहराव असल्याने त्यांच्याकडे पाहून कुणालाही त्या लुबाडणूक करतील? असा संशयही येत नाही. पण लुटले गेल्यानंतर नागरिक पश्चाताप करीत अाहेत. सोमवारी सकाळी ११.३० वाजता मू. जे. महाविद्यालय परिसरात ह्या तरुणी नागरिकांकडून पैसे उकळत हाेत्या. त्यांचा संशय अाल्यामुळे रामानंदनगर पाेिलसांनी या पाचही तरुणींना ताब्यात घेऊन चाैकशी करून साेडूनदिले. नागरिकांना लुटणारी माेठी टाेळी शहरातफिरत असून पाेिलसांनी गाफिल राहता त्यादृष्टीने तपास करून त्यांना जेरबंद करण्याची गरजनिर्माण झाली.
शहरात तीन ते चारदिवसांपासून २० ते २५ तरुणींची टाेळी मदत गाेळा करीतफिरत अाहे. इतर वेळेस त्या फाटके कपडे घालूनफिरतात. मात्र, मदत गाेळा करण्याच्या वेळी त्यांचा पेहराव काही अाैरच असताे. निळ्या रंगाचीि‍जन्स,फिकटपिवळ्या रंगाचा टाॅप अािण पायात थ्री इडिएट्स टाइपचे शूज घालून त्या पाच-पाचच्या गटानेफिरत असतात. त्यामुळे कुणालाही त्यांच्यावर संशय येत नाही. ‘अाम्ही राजस्थानमधील अनाथ मुलांच्या संस्थेसाठी काम करीत असून त्यांचे संगाेपन उपचारासाठी मदत द्या’ असे सांगून ते सुरुवातीला मदत मागतात. चांगल्या घरच्या मुली अाणि सामािजक काम करीत अाहे म्हणून एखाद्याने जर त्यांना ५० रुपयेदिले, तर त्या लगेच १०० रुपयांची मागणी करतात. एवढेच नव्हे तर अश्लील हावभाव करत त्या समाेरच्या नागरिकाला स्वत:कडे अाकर्षित करतात. त्याला भुलून एखादा बळी पडलाच तर ते त्याच्याकडून सर्व पैसे, माेबाइल, साेन्याचे दागिने असा एेवज लुटून पाेबारा करतात. हा प्रकार गेल्या काहीदिवसांपासून सुरू अाहे. पण अद्याप कोणीही पाेलिसांकडे तक्रार केली नसल्याने ही टाेळी नागरिकांना बिनधास्तपणे गंडवत अाहे.
अत्याचार झाला तर...
फॅशनकरूनफिरणाऱ्या या तरुणी शहरातबिनधास्त फिरत अाहेत. एखादा माथेफिरू त्यांना हेरून चुकीचे कृत्य करू शकताे. त्यामुळे पाेलिसांनी त्यांची चाैकशी करताना त्यांच्या सुरक्षेविषयी देखील चाैकशी करायला हवी हाेती. तसेच याबाबत त्यांच्या पालकांना कल्पना द्यायला हवी हाेती.
शहरात गेल्या वर्षीदेखील अशाच तरुणींची टाेळी दाखल झाली हाेती. त्यांचा पेहराव सुद्धा स्टायलिश असा हाेता. तसेच त्या नागरिकांना असाच गंडा घालत हाेत्या. त्यांच्याविषयी वृत्तपत्रात वृत छापून अाल्यानंतर त्यांनी पळ काढला हाेता. त्यामुळे हीच ती टाेळी तर नाही ना, असा संशय व्यक्त हाेत अाहे.