आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Police Take Action On Rickshaw Driver In Jalgaon

रिक्षाचालकांवर कारवाई; पोलिसांना राजकीय अडसर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - मुजोर रिक्षाचालकांना लगाम लावण्यासाठी पोलिस प्रशासनाला राजकीय पक्षांचे पदाधिकारी, नेतेमंडळी आदींचा रोष पत्करावा लागतो. असे धक्कादायक चित्र शहरात निर्माण झाले आहे.

रिक्षाचालकाकडून महिलेचा विनयभंग झाल्याची घटना घडल्यानंतर ‘दिव्य मराठी’ने मुजोर तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या रिक्षाचालकांवर कारवाई व्हावी, या उद्देशाने वेगवेगळ्या बाजूने वृत्तांकन केले जात आहे. यात पोलिस दलातील वरिष्ठ अधिकार्‍यांशीही चर्चा सुरू आहे. पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू करण्याचे अनेक प्रयत्न केले. मात्र, दोषी आढळून येणार्‍या रिक्षाचालकांवर राजकीय पुढार्‍यांचा वरदहस्त आडवा येतो, अशी धक्कादायक माहिती समोर येत आहे. एकीकडे प्रामाणिकपणे व्यवसाय करणार्‍या रिक्षाचालकांसाठी ही मोठी धोकादायक बाब आहे. दिवसभर शहरात प्रवासी वाहतूक करीत असताना नागरिकांची सेवा करणार्‍या प्रामाणिक रिक्षाचालकांना मुजोर आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या रिक्षाचालकांमुळे बदनाम व्हावे लागते आहे. राजकीय पुढार्‍यांनी पोलिसांच्या कारवायांमध्ये हस्तक्षेप केला नाही, तर ही समस्या दूर होऊ शकते. या संदर्भात राजकीय पक्षांच्या पदाधिकार्‍यांशी चर्चा केली असता त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
आमदाराने लावली शिस्त
अमळनेर तालुक्याचे आमदार साहेबराव पाटील यांनी शासनाला नोटीस देऊन रिक्षाचालकांची बेशिस्ती थांबवली आहे. पाटील यांनी अमळनेर शहरात रिक्षाचालकांना अधिकृत थांबे उपलब्ध करून दिले. रिक्षाचालकांनी बेशिस्त पार्किंग केल्यास ते स्वत: पोलिसांच्या मदतीने रिक्षाचालकांना दंड करण्याचे सांगतात. त्यामुळे तालुक्यात रिक्षाचालकांची मुजोरी पूर्णपणे संपुष्टात आली आहे.
राष्ट्रवादीही झाली तयार
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गफ्फार मलिक यांच्याशी चर्चा केली असता, त्यांनीही पाेलिस कारवाईत बाधा आणणे चुकीचेच असल्याचे कबुल केले आहे. गुन्हेगारी किंवा मुजोरी करणार्‍यांवर वचक निर्माण झालाच पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.