आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केबल नेटवर्क क्षेत्रात राजकीय हस्तक्षेप, पत्रकार परिषदेत माधव बेटगिरी यांचा अाराेप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - घराघरात पोहोचण्याची क्षमता असल्याने केबल नेटवर्क क्षेत्राचा वापर राजकीय मंडळी करून घेण्यासाठी सरसावल्या आहेत. त्यामुळे या क्षेत्रात राजकीय हस्तक्षेप वाढल्याने स्पर्धा तीव्र झाली असल्याचे इन जळगाव मीडिया अॅण्ड कम्युनिकेशन नेटवर्कचे संचालक माधव बेटगिरी यांनी शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. इन जळगाव मीडिया अॅण्ड कम्युनिकेशन नेटवर्कवर प्रशासनाने केलेली कारवाई राजकीय हस्तक्षेपामुळे झाली आहे काय? असा प्रश्न विचारला असता त्यांनी उत्तर देणे मात्र टाळले.

पत्रकार परिषदेला अॅड.अमीद सोनवणे, भगवान जाधव, राजेश जाधव उपस्थित होते. जळगावातील सर्व केबल ऑपरेटर्स ग्राहकांना केंद्र शासनाच्या कायद्याचे पालन करीत सेवा उपलब्ध करून देत आहेत. मात्र, नव्याने केबल व्यवसायात पदार्पण केलेल्या काही कंपन्यांकडून अपप्रचार हाेत आहे. त्याचप्रमाणे नव्या कंपनीच्या माध्यमातून काही बेकायदेशीर नवे केबल ऑपरेटर्स उभे केले जात आहेत. शासनाच्या डिजिटलायझेशनच्या नियमानुसार ३१ डिसेंबरअखेर शंभर टक्के केबल ग्राहकांना डिजिटलायझेशन करणे बंधनकारक होते. मात्र, खंडपीठाकडून त्याला सहा आठवड्यांची वाढीव मुदत दिली होती. परंतु जिल्हा प्रशासनाकडून डिजिटलायझेशनच्या नियमांचा आधार घेत प्रक्षेपण बंद करण्याची कारवाई केली. त्याला खंडपीठाने स्थगिती दिली आहे. आता यापुढेही इन जळगावची अॅनालॉग डिजिटल सेवा सुरू राहणार असल्याचेही सांगण्यात आले.