आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्रालयातील बैठकीला बोलावले नेमके कोणाला?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- महापालिकेच्या व्यापारी संकुलातील गाळेधारकांच्या करारावरू न सुरू झालेल्या वादंगासंदर्भात मंत्रालयात 20 रोजी दुपारी बैठक बोलावली आहे. या बैठकीला अधिकार्‍यांना बोलावले असले तरी गाळेधारक प्रतिनिधींच्या उपस्थितीबाबत कोणताही पत्रव्यवहार झालेला नसल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.

महापालिका व गाळेधारकांमध्ये नव्याने करार करताना प्रीमियमची रक्कम घेण्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला आहे. यात तोडगा काढण्याची मागणी त्यांनी केली होती. त्यानुसार नगरविकास विभागाने महापालिकेतील गाळे कराराबाबत चर्चा करण्यासाठी 20 रोजी बैठक होणार आहे. या बैठकीला जिल्हाधिकार्‍यांसह महापालिकेतील अधिकार्‍यांना सर्व माहिती घेऊन उपस्थित राहण्याचे कळवले आहे. त्यामुळे अधिकार्‍यांच्या उपस्थितीवर शिक्कामोर्तब झाला आहे. परंतु प्रश्न गाळेधारकांच्या प्रतिनिधींचा आहे. कारण यासंदर्भात अद्याप कोणतेच पत्र प्राप्त झालेले नाही. नगरविकास राज्यमंत्र्यांचे खासगी सचिव आर. के. धनावडे यांनी नगरविकास विभागाच्या सहसचिवांना पत्र पाठविले. त्यात महात्मा जोतिबा फुले मार्केटमधील तळमजला व पहिला मजला गाळेधारकांच्या प्रतिनिधींनाही निमंत्रित करण्याची विनंती केली होती; परंतु या पत्राचा अर्थ मात्र निमंत्रण मिळाल्याचे व उपस्थित राहण्याचे घेतले जात आहे. त्यामुळे काही गाळेधारक प्रतिनिधी बैठकीला उपस्थित राहण्याची तयारी करीत आहेत. तर काही उपस्थित राहण्याचे कोणतेही पत्र प्राप्त नसल्याने संभ्रम निर्माण झाला.