आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावात राजकारण रंगू लागले; भाजपच्या बेंडाळे, त्रिपाठींमध्ये चढाओढ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- महापालिका निवडणुकीत सत्तेपासून लांब रहावे लागलेल्या भाजप आता स्वीकृत सदस्यासाठी राजकारण रंगू लागले आहे. गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या ‘मामां’च्या ‘भाच्या’चा मार्ग कायद्यातील निकषामुळे अडचणीत आला आहे. त्यामुळे स्पर्धेत असलेले बेंडाळे व त्रिपाठींमध्ये चढाओढ निर्माण झाल्याने पक्षर्शेष्ठींचे कृपाछत्र कोणाच्या पाठीशी राहते, याकडे लक्ष लागले आहे. कार्यकर्त्यांच्या मते सभागृहात भाजपची छाप ज्याच्या माध्यमातून पडेल त्याला संधी द्यावी, असा सूर उमटत आहे.

नवीपेठ वॉर्डातून पराभूत झालेले अनिल पगारिया यांनी स्वीकृत सदस्यासाठी पक्षातील माजी पदाधिकार्‍यांकडून प्रय} सुरू केले आहेत. परंतु महापालिकेतील कामाचा अनुभव आवश्यक असल्याने त्यांचा मार्ग खडतर झाला आहे. तर नगरसेवकपदाचा अनुभव असलेले चंद्रकांत बेंडाळे यांनीही पक्षर्शेष्ठींकडे इच्छा व्यक्त केली आहे. यापूर्वी विरोधी पक्षनेत्याचा अनुभव, सभागृहात विषय मांडण्याची क्षमता, उद्योग क्षेत्रातील कामगिरी या मुद्यांच्या आधारे बेंडाळेंची दावेदारी पक्की मानली जात आहे. महापालिकेच्या स्थापनेनंतर सभागृह गाजवून भाजपची प्रतिष्ठा टिकवून ठेवण्यात ज्यांचा मोठा वाटा होता ते विशाल त्रिपाठी देखील स्वीकृत सदस्य पदासाठी इच्छुक आहेत. अभ्यासू व सभागृहात विषयाची मांडणी करून चर्चा घडवून आणण्याची त्यांची क्षमता आहे.