आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Political News In Marathi, Balani Inter In Bjp At Nashik

राष्ट्रवादीचे बालाणी ‘भाजप’मध्ये परतले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - सिसंधीसमाजातील नेते सहा वर्षांपासून राष्ट्रवादीत असलेले माजी नगरसेवक भगत बालाणी यांनी रविवारी नाशिक येथे भाजपषात प्रवेश केला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या प्रवेशाबाबत चर्चा सुरू होती.
बालाणी हे सुरुवातीला भाजपाचे दोन नगरसेवकांपैकी एक होते. त्यांनी शहराध्यक्षासह प्रदेश पातळीवर जबाबदारी सांभाळली आहे. सलग तीन वेळा नगरसेवकपद भूषवलेले बालाणी हे १९८९पासून भाजप विचारांशी जवळीक असलेले होते. मात्र, २००६मध्ये त्यांनी भाजपला राम-राम ठाेकत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. नाशिक येथे उत्तर महाराष्ट्र विधानसभा संचलन समितीची बैठक झाली. यात त्यांनी सहा वर्षांनंतर भाजपत प्रवेश केला.

तत्त्वांशी तडजाजे ड करू शकलो नाही
मीमूळचा भाजपचा कार्यकर्ता असून, भाजपचा सुरुवातीच्या काळातील पहिल्या दोनमधील नगरसेवक होतो पक्षाने तीन वेळा नगरसेवकपदाची संधी दिली. सहा वर्षांपासून राष्ट्रवादीत होतो मात्र, तत्त्वांशी तडजाेड करू शकल्याने भाजपत दाखल झालो. भगतबालाणी, माजीनगरसेवक