आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

युती, आघाडीच्या घोळात नेते-कार्यकर्ते गोंधळात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - महायुती होण्याबाबतचा तिढा कायम असला तरी, जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी दोन्ही पक्षांचे उमेदवार निश्चित आहेत. मात्र, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीत आघाडी होण्याबाबत कोणतीही चिन्हे नाहीत. तसेच अनेक ठिकाणी उमेदवार बदलण्याची शक्यता आहे. अधिसूचना प्रसिद्ध हा ठेऊन नामनिर्देशनपत्र भरले जात असताना उमेदवारदेखील निश्चित नसल्याने कार्यकर्त्यांसोबत पदाधिकाऱ्यांमधीलही संभ्रम कायम असल्याची स्थिती आहे.
कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीतील आघाडीसंदर्भात वरिष्ठ पातळीवर निर्णय रखडला असला तरी, त्याचे परिणाम मतदारसंघ आणि थेट छोट्या गावांतील राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांवरदेखील झाला आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते गेल्या पंधरवड्यापर्यंत आघाडीच्या उमेदवारासाठी काम करण्याच्या तयारीत होते. तसेच आघाडीचा निर्णय रखडल्याने स्वबळासाठी दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी तयारीला लागणार होते. मात्र, तेदेखील स्पष्ट नसल्याने सर्वांच्या नजरा मुंबईकडे लागल्या आहेत. दरम्यान, कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांच्या मते इतका गोंधळ यापूर्वी कधीही झाला नाही.