आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Political News In Marathi, Shivsena News , Divya Marathi

खाविआच्या नेतृत्वामुळे धनुष्यबाण पडद्याआड!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - मोदी सरकारमध्ये सर्वाधिक खासदार भाजपनंतर शिवसेनेचे आहेत. त्यामुळे देश आणि राज्य पातळीवर राजकीय वर्चस्व मिळवणारी शिवसेना जळगाव शहरात आपले अस्तित्व हरवून बसली आहे. विशेष म्हणजे जळगावात शिवसेनेचा आमदार असतानाही पक्षाला आपली ओळख निर्माण करण्याची गरज निर्माण झाली आहे. सोयीनुसार भूमिका ठरवण्याच्या खान्देश विकास आघाडीमुळे शिवसैनिकांची कोंडी झाली आहे. विधानसभेच्या निमित्ताने संघटनेला ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी धडपड सुरू आहे.

लोकसभा निवडणुकीत राज्यात रिंगणातील उमेदवारांच्या तुलनेत शिवसेनेचे सगळ्यात जास्त 18 उमेदवार निवडून आले. राज्यात मिळालेल्या या यशामुळे पक्षाची ताकद वाढली आहे. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये प्रचंड आत्मविश्वास वाढला आहे. परंतु या उलट चित्र जळगाव शहरातील आहे. जळगावात शिवसेनेचा आमदार असताना हवे तसे प्राबल्य पाहायला मिळत नाही. शहरातील सत्तेचे केंद्र असलेल्या महापालिकेत शिवसेनेऐवजी खान्देश विकास आघाडीचा झेंडा फडकत आहे. नेमके त्याचे नेतृत्व सध्या घरकुल प्रकरणात अडकलेले आमदार सुरेश जैन यांच्याकडे आहे.

पक्षविरहीत म्हणवल्या जाणार्‍या खान्देश विकास आघाडीत शिवसेनेचा एकमेव नगरसेवक आहे. त्याच्यावरदेखील खान्देश विकास आघाडीचा शिक्का आहे. त्यामुळे शहरात ताकद आहे तर ती खाविआचीच, असाच संदेश दिला जातो. त्यामुळे खर्‍या अर्थाने शिवसैनिक असलेल्यांची गळचेपी होत असल्याच्या भावना खासगीत व्यक्त केली जाते. यावरून पक्ष किती गांभीर्याने पाहतो, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे.