आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घेतला भाजपच्या ‘अब की बार’चा सहारा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात वापरलेली तसेच संपूर्ण देशात गाजलेली पंचलाइन ‘अब की बार, मोदी सरकार’चा सहारा आता राष्ट्रवादी काँग्रेस घेण्याच्या तयारीत आहे. उमेदवारांच्या फोटोचे वॉल गेल्या दोन दिवसांपासून ‘व्हॉट्स अँप’वर झळकू लागल्याने तो सध्या चर्चेचा विषय झाला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीचे उमेदवार अद्याप कोणत्याही पक्षाने जाहीर केलेले नाही. मात्र, जिल्ह्यातील प्रमुख पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या नावाने ‘व्हॉट्स अँप’वर प्रचाराचे वॉल शेअर होत आहेत. यात विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते विनोद देशमुख यांच्या वॉलमध्ये मोदी यांच्या पंचलाइनचा वापर केला जात आहे. उमेदवार घोषित होण्याच्या आधीच दबाव निर्माण करण्याच्या हालचाली सुरू असल्याचेही राजकीय वतरुळात बोलले जात आहे.
विनोद देशमुख :
राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आहेत. एका वॉलमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या फोटोसह विनोद देशमुख यांचा फोटो आहे. त्याच्या शेजारी ‘गेली असेल लोकसभा विधानसभा अजून बाकी आहे, आला असेल मोदी पण आमचा अजितदादा अजून बाकी आहे’ तसेच ‘अबकी बार विनोदभाऊच आमदार’ जळगाव विधानसभा मतदारसंघ. असे लिहिले आहे.
मुखवट्याचीही कॉपी

लोकसभा निवडणूक प्रचारात भाजपतर्फे नरेंद्र मोदी यांच्या मुखवट्यांचा मोठय़ा प्रमाणावर वापर करण्यात आला. आता ललित कोल्हे यांच्या फोटोचा मुखवटा तयार करण्यात आला आहे. एका व्यक्तीने कोल्हे यांचा मुखवटा घालून तसा फोटो ‘व्हॉट्स अँप’वर शेअर केला आहे.