आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपला बाहेर ठेवण्यासाठी खाविआ-राष्ट्रवादीचे गुळपीठ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - लोकसभेपाठाेपाठ विधानसभेत घवघवीत यश िमळवल्यानंतर महापालिकेच्या राजकारणातही वर्चस्व मिळवण्याच्या दृष्टीने हालचाली करणाऱ्या भाजपला सत्तेबाहेरच ठेवण्यासाठी सत्ताधारी खान्देश विकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस हातमिळवणी करण्याच्या तयारीत आहेत.विधानसभेत सत्ता गेल्यानंतर कासाविस झालेल्या राष्ट्रवादीनेही या संधीचा फायदा घेण्यासाठी बाहेरून पाठिंबा देण्याऐवजी महापालिकेच्या सत्तेत थेट वाटा मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. खाविआ आणि राष्ट्रवादी एकत्र आल्यास भाजप अािण मनसेला परस्पर काटशह मिळणार आहे.
विधानसभा अधिवेशनासाठी रविवारी रात्री नागपूरला रवाना होण्यापूर्वी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ.सतीश पाटील यांनी भाजपचे आमदार सुरेश भोळे यांच्याशी चर्चा केली होती. यापूर्वी स्थायी समिती निवडणुकीत खाविआसोबत जाण्यास काही नगरसेवकांनीही नकार दिला होता. स्थायी समिती सभापतीसाठी नरेंद्र पाटील यांच्या नावावर भाजप-मनसे-राष्ट्रवादी यांचे जवळपास एकमत झाले होते. परंतु पाटील यांनीच ऐनवेळी नकार दिला. त्यानंतर दोन दिवसांत पडद्यामागे जोरदार हालचाली झाल्या आणि सत्ताधारी खाविआ-राष्ट्रवादी यांचे गुळपीठ जमले आहे.
महापालिकेच्या सप्टेंबर २०१३ मध्ये झालेल्या तिसऱ्या सार्वत्रिकनिवडणुकीत काठावर बहुमतात असलेल्या खाविआला राष्ट्रवादी काॅंग्रेसने बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला हाेता. याची परतफेड म्हणून लाेकसभानिवडणुकीत अाघाडीने राष्ट्रवादी काॅंग्रेसला मदत केली हाेती. सव्वा वर्षांपासून सत्ताधाऱ्यांशी असलेल्या मैत्रिपूर्ण संबंधांनंतरही वाॅर्डात कामे करताना खाविआपुढे हात पसरवावे लागत हाेते. नगरसेवकांनी यासंदर्भात वरिष्ठांकडे वेळाेवेळी व्यथाही मांडल्या, मात्रविधानसभानिवडणुका अाणि राज्यातील राजकीय समिकरणे पाहता त्याकडे दुर्लक्ष केले जात हाेते. मात्र, अाता लवकर काेणत्याहीनिवडणुका नसल्याने समीकरणे बदलण्याच्या दृष्टीने अनुकूल वातावरण अाहे. त्यामुळे राज्यात विरोधी बाकावर असले तरी महापािलकेत सत्तेत सहभागी हाेण्याचे वेध राष्ट्रवादीला लागले अाहेत. सत्तेत सहभागी हाेण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादीला दुय्यम पदांवर नव्हे तर काही महिन्यांसाठी महापाैर अाणि उपमहापाैर पदांसह इतर समित्यांवरील महत्त्वाची पदे हवी अाहेत. सत्ताधारी खान्देशविकास अाघाडीच्या नेत्यांनी यास अनुकूलता दर्शवल्यास राष्ट्रवादीचा पालिकेतील सत्तेत सहभागी हाेण्याचा मार्ग माेकळा हाेणार अाहे. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची जळगाव शहरातील घाैडदाेड राेखण्यासाठी सत्ताधारीदेखील यासंदर्भात सकारात्मक निर्ण्‍णयर्णय घेऊ शकते.