आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भ्‍ुासावळ तालुक्यात राजकारण तापणार!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - कंडारी,साकेगावसह तालुक्यातील तब्बल २६ ग्रामपंचायतींचा कार्यक्रम जाहीर झाला अाहे. राज्यातील दुसऱ्या टप्प्यात या निवडणुका हाेतील. जुलै राेजी यासाठी अधिसूचना निघून १३ जुलैपासून उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात हाेईल. इच्छुकांच्या माेर्चेबांधणीला वेग अाल्यानेे गावकीचं राजकारण तापू लागले अाहे. गुप्त बैठका घेण्यावर भर दिला जात अाहे.
सप्टेंबर ते अाॅक्टाेबर २०१५ कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने पावसाळ्यात राजकीय रंगांची उधळण हाेणार अाहे. अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध झाल्याने इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले अाहे. स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार जुलैला निवडणुकीची नाेटीस जाहीर हाेईल. त्यानंतर १३ ते ३० जुलैदरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करणे, २१ राेजी छाननी, २४ राेजी माघार चिन्ह वाटप, अाॅगस्टला मतदान अाणि अाॅगस्टला मतमाेजणी हाेऊन निकाल जाहीर हाेईल.

भुसावळ विधानसभा मतदारसंघातील राजकारणात खडका, कंडारी या दाेन ग्रामपंचायतींची भूमिका महत्त्वाची असते. त्यामुळे या ठिकाणची निवडणूक चुरशीची हाेण्याचे संकेत अाहेत.
विकास संस्थांची प्रक्रिया
पिंपळगावबुद्रूक, अाेझरखेडा, काहुरखेडा, खंडाळे या विविध कार्यकारी सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली अाहे. त्यामुळे ग्रामीण भागातील सहकाराचे राजकारण प्रचंड तापले अाहे. भुसावळ शहरातील महाकाली अर्बन पतसंस्थेच्या मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात अाल्या अाहेत.

‘रेल्वे कंझ्युमर्स’मध्ये चुरस
दीभुसावळ रेल्वे एम्प्लाॅइज‌ कंझ्युमर्स काे-अाॅप साेसायटीचाही निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला अाहे. १७ ते २२ जूनपर्यंत अर्ज स्वीकारण्यात अाले. ११ जागांसाठी १४ अर्ज दाखल झाले अाहेत. माघारीची मुदत २५ जून ते जुलैपर्यंत अाहे. त्यात किती उमेदवार माघार घेतात? याकडे लक्ष अाहे.
या गावांत निवडणूक
साकेगाव,जाेगलखेडा, सुसरी, मन्यारखेडा, जाडगाव, बाेहर्डी बुद्रूक, बेलव्हाय, वांजाेळा, साकरी, खडके, खंडाळे, किन्ही, हतनूर, टहाकळी, अाचेगाव, पिंपळगाव बुद्रूक, कंडारी, काहुरखेडा, फेकरी, पिंप्रीसेकम-निंभाेरा, शिंदी, दर्यापूर, कठाेरा बुद्रूक, कठाेरा खुर्द, कुऱ्हा प्र.न. मांडवेदिगर.