आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धनंजय मुंडेंच्या सभेत भाजपच्या आरोपांवर शिक्कामोर्तब

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - शहरातील राष्ट्रवादी अद्यापही शिवसेनेचे माजी आमदार संतोष चौधरी यांच्या इशाऱ्यानुसारच चालते, दोघांची छुपी सलगी आहे, असे आरोप भाजपकडून सातत्याने केले जातात. मात्र, मंगळवारी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या सभेत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी नगराध्यक्ष नगरसेवकांना माजी आमदारांनी हायजॅक केल्याचे जाहीर वक्तव्य केले. यामुळे आता भाजपने केलेल्या आरोपांवर शिक्कामोर्तब झाले आहे. पक्षातील उभ्या फुटीची शिदोरी घेऊन राष्ट्रवादी पालिका निवडणुकीला कसे तोंड देणार, हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरेल.
धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत मंगळवारी रजा टॉवर चौकात जाहीर सभा झाली. या सभेत स्वकीयांनीच राष्ट्रवादीचे नगरसेवक दोन्ही नगराध्यक्षांवर टीकेची झोड उठवली. राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केलेले माजी आमदार संतोष चौधरी यांच्या इशाऱ्याने राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष आणि नगरसेवक काम करतात, असा आरोप यापूर्वी भाजपकडून झाला आहेत? याच आरोपाला पुष्टी देणारा प्रकार मंगळवारच्या सभेत घडला. माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे व्यासपीठावर असताना राष्ट्रवादीच्या अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन निकम प्रदेश सदस्य विजय चौधरी यांनी सत्ताधारी गटावरच टीका केली. सत्ताधारी राष्ट्रवादीला सध्या शिवसेनेत असलेले माजी आमदार संतोष चौधरींनी हायजॅक केल्याचे जाहीर वक्तव्य प्रथमच झाले. यामुळे भाजपने केलेल्या आरोपांवर शिक्कामोर्तब झाले. पक्षाचे नेते शहरात आल्यावरही नगराध्यक्ष अख्तर पिंजारी नगरसेवकांनी सभेकडे पाठ फिरवली. निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीतील फूट समोर आली.

Á नेतृत्वाच्या मुद्याकडे दुर्लक्ष : सत्ताधारीराष्ट्रवादीला आता शहरात नेतृत्व नाही, ही संधी पाहून प्रदेश सदस्य तथा माजी प्रभारी नगराध्यक्ष विजय चौधरी यांनी नेतृत्वासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मंगळवारच्या सभेत आगामी पालिकेच्या निवडणुका राष्ट्रवादी कोणाच्या नेतृत्वाखाली लढवणार हे जाहीर होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, मुंडे यांनी केवळ
राष्ट्रीय स्तरावरील भाष्य स्थानिक आमदार सावकारेंवर टीका करण्याव्यतिरिक्त अन्य मुद्यांना स्पर्श केला नाही. यामुळे राष्ट्रवादीच्या शहरातील नेतृत्वाचा प्रश्न अद्याप कायम आहे.
Áमुस्लिम मते टिकवण्याचा प्रयत्न : विविधपक्षांचे संघटन आपल्याच ताब्यात राहावे, यासाठी प्रयत्न होत आहेत. विजय चौधरी यांनी मुस्लिमबहूल भागात सभा घेऊन मुस्लिम मतदान राष्ट्रवादीकडेच कायम ठेवण्याचा प्रयत्न केला. गफ्फार मलिकदेखील उपस्थित असल्याने मुस्लिम मतदारांचा पाठिंबा मिळवण्याचा हेतू समोर आला.

आघाडीचा पर्याय
राष्ट्रवादीच्या जाहीर सभेला उमेश नेमाडे वगळता विद्यमान नगराध्यक्ष आणि एकही नगरसेवक उपस्थित नव्हता. यामुळे आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीचे नगरसेवक बंडखोरी करून नव्याने तयार होणाऱ्या आघाडीकडून निवडणूक लढतील? असाही निष्कर्ष समोर आला आहे. अंतर्गत कुरघोड्या, समांतर गटबाजी, नगराध्यक्षांनी शिवसेनेचे माजी आमदार सुरेश जैन यांची नगरसेवकांसोबत घेतलेली भेट हा सर्व घटनाक्रम पाहता, राष्ट्रवादीची वाटचाल बिकट वाटत आहे.

बातम्या आणखी आहेत...