आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Politics News In Marathi, Challenge To Maintain Candidate, Divya Marathi News

शिलेदारांची र्मजी सांभाळण्याचे आव्हान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- पक्षाचे चार आमदार, इतर मातब्बर पदाधिकार्‍यांचा मतदारसंघातील प्रभाव आणि वैयक्तिक प्रयत्नामुळे राष्ट्रवादीला जळगावमधून विजयाची आशा आहे. तर मैदान गाजवणारे राष्ट्रवादीचे पुढारी निवडणुकीच्या राजकीय तहात हमखास हरतात हे गणित डोळ्यासमोर ठेवून भाजपाकडूनही डावपेच आखले जात आहेत. दोन्ही उमेदवारांकडून लढाईची मदार असलेल्या शिलेदारांची र्मजी सांभाळण्याचेच काम सध्या जळगाव मतदारसंघात सुरू आहे.
जळगाव मतदारसंघातील पारोळा केंद्रित राजकारणात निवडणुकीची समिकरणे नेहमीच वेगळी राहिली आहेत. गेल्या निवडणुकीतदेखील लोकसभेचे दोन्ही उमेदवार पारोळ्यातील होते. अँड.वसंतराव मोरे यांचा तब्बल एक लाख मतांनी पराभव झाल्यावर याच मतदारसंघात राजकीय वाटाघाटीतून विधानसभेला राष्ट्रवादीला मोठे यश मिळाले. ही परिस्थिती डोळ्यासमोर ठेवून डॉ.सतीश पाटील आणि खासदार ए.टी.पाटील यांची अंतर्गत यंत्रणा कामाला लागली आहे.
जळगाव शहर-ग्रामीणवर लक्ष
जळगाव शहरातून खाविआची मदत होईल. या अपेक्षेने प्रयत्न सुरू असले तरी ग्रामीण मतदारसंघात आमदार गुलाबराव देवकर गटाकडून मदत होईल की नाही, याबाबत राष्ट्रवादीतच साशंकता आहे. याउलट शहरातून खाविआसाठी प्रयत्नांची पराकाष्टा करणार्‍या खासदार ए.टी.पाटलांना या वेळीही देवकर गटाची मदत होईल अशी अपेक्षा त्यांना लागून आहे. धरणगाव तालुक्यात गुलाबराव पाटील, संजय पवार, डी.जी.पाटील, ज्ञानेश्वर महाजन यांच्याकडून मदतीसाठी दोन्ही उमेदवारांमध्ये वैयक्तिक पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र, त्यांनी कौल दिलेला नाही आणि आपली भूमिका वरून कोणती आणि आतून कोणती हेही कळू दिले नाही.
चाळीसगाव ठरेल निर्णायक
लोकसभा मतदारसंघात सर्वात मोठा विधानसभा मतदारसंघ असलेल्या चाळीसगावमधून आमदार राजीव देशमुख यांच्यावर राष्ट्रवादीला लीड देण्याची जबाबदारी आहे. तर पक्षांतर्गत वाद, बेलगंगा कारखान्याचा विषय हे मुद्दे विचारात घेऊन नाराज शिलेदारांचे मन वळवण्यासाठी भाजपाकडून प्रयत्न होत आहे. त्यामुळे या तालुक्यात देशमुखांची कसोटी लागणार आहे.
स्थानिकांच्या भूमिकेवर संशय
राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी झाल्यास आमदार चिमणराव पाटील यांचा विधानसभेचा रस्ता अधिक मोकळा होणार आहे. पक्षातून मदत न झाल्यानेच अँॅड.वसंतराव मोरेंचा पराभव झाला. पक्षाच्या भूमिकेला बांधले असले तरी या दोघांची अंतर्गत मदत होईल, याचा अंदाज बांधला जात आहे. तर एरंडोलमध्ये माजी आमदार महेंद्रसिंग पाटील यांच्यासह दिग्गजांची भूमिकाही निर्णायक ठरणार आहे.