आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Politics Use For Social Purposes, Say Kalpita Patil

राजकारणाचा उपयोग समाजकारणासाठी करणार, तरूण सरपंच कल्पिता पाटीलचा निश्चय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - धरणगाव तालुक्यातील कल्याणे होळ या 2,100 लोकसंख्येच्या गावाची सरपंच होण्याचा मान 19वर्षीय कल्पिता पाटील हिला मिळाला आहे. ती जळगावात शासकीय तंत्रनिकेतनमध्ये पदविकेच्या दुसर्‍या वर्षाला (इलेक्ट्रॉनिक्स अँण्ड टेलिकम्युनिकेशन) शिकत आहे. तिने बुधवारी ‘दिव्य मराठी’ कार्यालयास भेट दिली. या वेळी रोपटे देऊन तिचे स्वागत करण्यात आले. तिच्याशी साधलेला संवाद तिच्यात शब्दांत..


* महिलांना शिक्षित करण्यास माझे प्रथम प्राधान्य राहणार आहे. त्यामुळे महिलांसाठी मी दोन बचतगटही स्थापन केले आहेत. तसेच गावाला व्यसनमुक्त करण्याचा संकल्पही मी केला आहे.

* घरातूनच लहानपणापासून समाजकारणाचे धडे मिळाले. आजोबांची हीच शिकवण असल्याने मनात ते रुजत गेले. त्यामुळे समाजासाठी आपणही काहीतरी करायला हवे, असे सतत वाटायचे. त्यातच सुप्रिया सुळे यांचे विचार मला आवडले. त्यामुळे राष्ट्रवादी युवती सभेत मी सामील झाले. आता त्या माध्यमातून समाजकारण करणार असल्याने राजकारणातील कोणतेही लक्ष्य मी नजरेसमोर ठेवलेले नाही.

* आईने प्रोत्साहित केले. तसेच ठरवलेले काम करायची तयारी असेल तर पुढे जा, असे वडिलांचे नेहमीच सांगणे असल्याने मी सरपंच झाले. त्यामुळे ग्रामस्थांसह मैत्रिणींच्यादेखील माझ्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत.

* उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गावाच्या विकासासाठी 50 लाखांचा निधी दिला आहे. त्या निधीतून गावात चांगले रस्ते करणार आहे. तसेच उर्वरित निधीतून वाचनालय, महिलांसाठी शिबिरे, बचत गटांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवण्याचा मानस आहे.