आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतदान यंत्रे सील, उद्या मतदान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - पालिकेच्या प्रभाग तीन- "क' आ णि प्रभाग सहा- "अ' अशा दोन जागांसाठी रविवारी (दि. १०) मतदान होणार आहे. शुक्रवारी २२ मतदान यंत्रे नगरपालिका सभागृहात सील करण्यात आ ले. निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत विजयकुमार भांगरे यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली.

दोन्ही प्रभागांत निवडणूक लढवणारे उमदेवार आ णि प्रतिनिधी उपस्थित होते. दोन प्रभागांतील पोटनिवडणुकीसाठी १० जानेवारी रोजी मतदान होणार असून १८ बूथ असतील. यादृष्टीने प्रत्येक बूथवर एक आणि चार राखीव मशीन असतील. ही प्रक्रिया राबवताना उमेदवार मेघा वाणी स्वत: तर अन्य उमेदवारांचे प्रतिनिधी, सहायक अधिकारी तथा मुख्याधिकारी बी.टी.बाविस्कर, सुभाष ठाकूर यांच्यासह नियुक्त केलेले कर्मचारी उपस्थित होते.

जाहीरप्रचार थांबला :पालिकेच्या दोन जागांसाठी १० जानेवारी रोजी मतदान होणार आहे. जाहीर प्रचार शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता थांबला दोन्ही प्रभागांमध्ये १० हजारांपेक्षा अधिक मतदार असल्याने उमेदवारांना सर्व भागांत प्रचार करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली. प्रचार संपल्यानंतर उमेदवारांनी लावलेले बॅनर्स काढण्यात आ ले आ हेत. आ ता गुप्त बैठकांवर भर दिला जात आहे.

^पालिकेच्या पोटनिवडणुकीसाठीलागणारी २२ मतदान यंत्रे सील करण्यात आ ली आ हेत. नियुक्त कर्मचाऱ्यांना शनिवारी मतदानाचे साहित्य वाटप होईल. त्यानंतर ते संध्याकाळी मतदान केंद्रांवर रवाना होतील. प्रशासकीय तयारी अंतिम टप्प्यात आ ली आ हे. विजयकुमार भांगरे, निवडणूकनिर्णय अधिकारी तथा, प्रांताधिकारी, भुसावळ

विघ्नसंतोषींवर वॉच : दोन्हीप्रभागांची पोटनिवडणूक ही शांततेत पार पडावी, यासाठी पोलिस विघ्नसंतोषींवर लक्ष ठेवून आ हेत. वेळोवेळी गुप्त माहिती घेऊन आ ढावा घेतला जात असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी ‘दिव्य मराठी’ला दिली.

असे आ हेत मतदार : प्रभागतीन"क' मध्ये १० हजार ९०५ मतदार आ हेत. प्रभाग सहा "अ'मध्ये ११ हजार ५०३ मतदार आ हेत. दोन्ही प्रभागात प्रत्येकी नऊ मतदान केंद्र आ हेत. सर्व ठिकाणी चोख पोलिस बंदोबस्त तैनात आहे.

मतदारांत संभ्रम : राजकीयपक्षांनी दोन्ही जागा ताकदीने लढण्यावर भर दिला आहे. मात्र, त्यातच तापी विकास फ्रंटने शुक्रवारी नकारात्मक मतदानासाठी रॅली काढल्याने उमेदवारांना अनपेक्षितपणे आ श्चर्याचा धक्का दिला.