आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळे शहरात गल्ली क्रमांक दोन भागात होतोय दूषित पाणीपुरवठा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - शहरात पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी काही महिन्यांपूर्वी सर्व लहानमोठय़ा गळत्या काढण्यात आल्या आहेत. मात्र, काही दिवसांपूर्वी गल्ली क्रमांक दोन भागात सांडपाणीमिर्शित पाण्याचा पुरवठा होत असल्याची तक्रार बुधवारी नागरिकांनी केली. या वेळी दूषित पाण्याच्या बाटल्या नागरिकांनी महापालिकेत आणल्या होत्या.

सध्या निवडणुकीच्या कामकाजात प्रशासन गुंतल्याने रोजचे काम सांभाळताना कर्मचार्‍यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. नागरिकांच्या समस्या निवारणे, मंजुरी आदी प्रकारची कामे सुरू आहेत. पाणीपुरवठय़ाच्या तक्रारी सध्या कमी झाल्या आहेत. प्रशासनाने उन्हाळयात बहुतांश गळत्या काढल्या आहेत. शहरातील पाइपलाइन अनेक ठिकाणी जुनी झाली आहे. ती बदलण्याची गरज आहे. त्यातून कायम पाइपलाइनला गळती लागते. त्याचप्रमाणे गल्ली क्रमांक दोन भागात काही दिवसांपासून सांडपाणीमिर्शित पाणी येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यासंदर्भात तक्रार करूनही दखल घेतली जात नव्हती. मात्र, गळतीच्या दुरुस्ती कामाला विलंब होत असल्याने नागरिक दूषित पाण्याचा नमुना महापालिकेत उपायुक्त हनुमंत कौठळकर यांच्याकडे घेऊन आले होते. त्या वेळी त्यांनी पाणीपुरवठा विभागातील कर्मचार्‍यांना सूचना करून तत्काळ दुरुस्तीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार तेथे काम करून ही गळती बंद करण्यात आली आहे, अशी माहिती ओव्हरसियर प्रदीप चव्हाण यांनी दिली आहे.