आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तंत्रनिकेतनमध्ये प्रवेशप्रक्रिया सुरू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी तंत्रनिकेतनच्या थेट द्वितीय वर्ष प्रवेशासाठीची प्रक्रिया मंगळवारपासून सुरू झाली. दोन वर्षांपासून आयटीआय झालेल्या विद्यार्थ्यांनाही यात १० टक्के जागांवर प्रवेश देण्यात येणार आहे. अॅप्लिकेशन किटची किंमत खुल्या वर्गासाठी २५० रुपये आणि राखीव गटातील विद्यार्थ्यांसाठी १५० रुपये आहे. यासाठी www.dtemaharashtra.gov.in/despoly2015 या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.
अशी होईल प्रक्रिया
अर्ज विक्री आणि स्वीकृती २३ जून ते जुलैपर्यंत होईल. तसेच याच तारखांमध्ये प्रवेश िनश्चिती कागदपत्र पडताळणीही विद्यार्थ्यांना करायचे आहे. जुलै रोजी सायंकाळी वाजेपर्यंत कागदपत्र पडताळणीची अंितम मुदत असेल. ही प्रक्रिया विद्यार्थ्यांना एआरसी सेंटरवर करायची आहे.
कीट घेतल्यावर ऑनलाइन अर्ज विद्यार्थ्यांनी भरायचे आहेत. कीटमध्ये एक स्क्रॅच पासवर्ड देण्यात येईल. जेणेकरून घरच्या घरीदेखील अर्ज भरता येतील. तात्पुरती गुणवत्ता यादी संकेतस्थळावर जुलै रोजी सायंकाळी वाजेपर्यंत प्रसिद्ध होईल. ते जुलैदरम्यान विद्यार्थ्यांना आक्षेप एआरसी सेंटरवर जाऊन नोंदवता येतील. जुलै रोजी अंतिम गुणवत्ता यादी सायंकाळी वाजेपर्यंत प्रसिद्ध होईल. पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज संस्थांमधून १७ जुलै रोजी सायंकाळी वाजेपर्यंत मागवण्यात येतील. यानंतर समुपदेशनासाठीची फेरी २० ते ३१ जुलैदरम्यान होईल. प्रवेशासाठीचा कटऑफ १० ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात येणार आहे.
प्रवेशासाठी पात्रता
बारावी सायन्स, आयटीआय ट्रेड, सीटीसी, एटीएस, सीओई, बारावी बायफोकल म्हणजे द्विलक्षीय अभ्यासक्रम, एमसीव्हीसी, आयटीआय विद्यार्थ्यांसाठी व्होकेशनलटेक्निकल, इलेक्ट्रॉनिक्स मेंटेेनन्स १, मेकॅनिकल मेंटेनन्स ए- १, स्कुटर अँड मोटारसायकल सर्व्हिसिंग ३, जनरल सिव्हिल इंजिनिअरिंग ए- ४, केमिकल प्लांट ऑपरेशन सी- ३, इलेक्ट्रॉनिक्स सी - २, कॉम्प्युटर सायन्स डी-९. विद्यार्थी पात्र राहतील.
बातम्या आणखी आहेत...