आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवस्था : वैतागलेली खाविअा सत्ता साेडण्याच्या तयारीत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - कर्जाच्या डाेंगरामुळे महापालिकेची अार्थिक स्थिती तसूभरही बदललेली नाही. राज्यात सरकार बदलल्यानंतर फरक पडेल, ही अपेक्षा असताना उलट सहा महिन्यांत अाणखी काेंडी वाढली अाहे.
अार्थिक स्थिती सुधारण्याएेवजी अाणखी बिघडतेय. त्यामुळे व्यथित झालेले सत्ताधारी खान्देश विकास अाघाडीचे नेते पालिकेतील सत्ता साेडण्याच्या मानसिकतेपर्यंत पाेहाेचले अाहेत. याबाबत वैयक्तिक मते स्पष्टपणे मांडली जात असली तरी, पक्ष म्हणून याबाबत लवकरच ठाेस भूमिका जाहीर हाेण्याची शक्यता अाहे.
हुडकाे या वित्तीय संस्थेकडील कर्जाचा डाेंगर ६१३ काेटींपर्यंत पाेहाेचला अाहे. त्यामुळे कारवाईचा फास गळ्यापर्यंत अाला असून, प्रशासन सत्ताधारी यांच्यात फार चांगले वातावरण राहिलेले नाही. सत्ताधाऱ्यांसाेबत भाजप अन्य राजकीय पक्षही प्रशासनाबाबत सकारात्मक विचार करताना दिसत नाहीत. प्रशासन कामे करण्यापेक्षा ती बिघडतील कशी त्यांना विलंब कसा हाेईल यासाठीच अधिक प्रयत्न करत असल्याचा अाराेप सातत्याने हाेताेय. तसेच केलेल्या सूचनांवर कार्यवाही केली जात नसल्याने नागरिकांच्या संतापाला नगरसेवक बळी पडत अाहेत. अाहे त्या परिस्थितीतून मार्ग काढणे शक्य असताना सातत्याने परवानगीच्या नावाने प्रश्न लाल फितीत अडकवला जात असल्याची टीका हाेत अाहे.
त्यामुळे सत्ता असूनही कामे केली जात नसतील, तर त्या सत्तेचे करायचे काय? अशा भावना खाविअाचे नेते व्यक्त करत अाहेत. त्यापेक्षा महापाैर उपमहापाैरांना राजीनामा द्यायला लावून विराेधात काम करण्याची तयारीही बाेलून दाखवली जातेय. याबाबत लवकरच खाविअाचे अध्यक्ष रमेश जैन यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन निर्णय हाेण्याची शक्यताही वाढली अाहे.

राजीनामा द्यायची मानसिकता अाहे

जनतेच्या हितासाठी महापाैर उपमहापाैरपद असते. जनतेचे प्रश्न साेडवण्यात अडचणी उभ्या केल्या जात असतील, तर काय करायचे अशा पदाला? अार्थिक स्थिती सुधारण्यासाठी काेणतेही प्रयत्न प्रशासन करत नाही, उलट त्यात अडचणी वाढवल्या जातात. त्यामुळे खरेच राजीनामा द्यायची मानसिकता अाहे. सुनील महाजन, उपमहापाैर

नेते सांगतील ते निर्णय मान्य

सत्तेच्या माध्यमातून विकास साधणे हा उद्देश असताे. मात्र, तसे हाेता शहराची वाईट अवस्था हाेत अाहे. त्यामुळे नेत्यांनी निर्णय घेतल्यास राजीनाम्याची तयारी अाहे. -राखी साेनवणे, महापाैर

सत्तेचा उपयाेग नाही

सभागृहात प्रश्न मांडूनही ते सुटत नाहीत. प्रशासन सकारात्मकतेपेक्षा नकारात्मक भूमिकेतच असते. समस्या साेडवण्याएेवजी त्यात असलेल्या अडचणी मांडण्यावरच भर दिला जाताे. त्यामुळे प्रशासन काेणाच्या हातचे बाहुले बनले की काय? असा प्रश्न पडताे. तसेच सत्तेचा काही उपयाेग राहिलेला दिसत नाही.
अाम्ही सत्ता साेडून उपयाेग हाेत असेल, तर तशीही मानसिकता अाहे. रमेशदादा असते तर अाज खरेच महापाैर उपमहापाैरांना राजीनामा द्यायला लावण्याचा विषय मांडला असता. तथापि, हे माझे वैयक्तिक मत अाहे. -नितीन लढ्ढा, नेते, खाविअा