आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तरुणीला अश्लील एमएमएस पाठवणारा पाेलिसांच्या ताब्यात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- शहरातील तरुणीशी फेसबुकच्या माध्यमातून मैत्री केल्यानंतर फेसबुक व्हॉट्सअॅपवरून अश्लील एसएमएस एमएमएस पाठवणाऱ्या मुंबईच्या एकाला रामानंदनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पवईच्या सचिन सुदाम जाधव (वय २८) याने रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका महाविद्यालयीन तरुणीशी गेल्या महिन्यात फेसबुकवरून मैत्री केली. काही दिवस गप्पा मारून मेसेज पाठवल्यानंतर त्याने तरुणीला अश्लील एमएमएस पाठवण्यास सुरुवात केली. त्यामुळे तिने १४ एप्रिल रोजी यासंदर्भात रामानंदनगर पोलिसात विनयभंगाची तक्रार दिली. याप्रकरणी पोलिस निरीक्षक प्रवीण वाडिले यांनी हवालदार राजेंद्र उगले यांच्यासह मुंबईला पथक पाठवले सोमवारी सकाळी वाजता पवई ये‌‌थून सचिनला ताब्यात घेतले.
बातम्या आणखी आहेत...