आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘पोर्टर प्राइज’ देऊन जैन इरिगेशन सन्मानित

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: नवी दिल्ली येथे एका विशेष समारंभात पोर्टर प्राईज-२०१५ स्वीकारताना जैन इरिगेशनचे व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन, वरिष्ठ अधिकारी सुरेंद्र माखीजा.
जळगाव - जागतिकपातळीवर व्यवस्थापन क्षेत्रात ‘मार्केटिंग गुरू’ म्हणून ख्यातीप्राप्त मायकल पोर्टर यांच्या नावे असलेले ‘पोर्टर प्राइज’ देऊन जैन इरिगेशनला नुकतेच सन्मानित करण्यात आले. दिल्ली येथे आयोजित एका समारंभात जैन इरिगेशनचे व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन यांनी हे पारितोषिक स्वीकारले. कॉर्पोरेट जगतात मूल्यात्मक वृद्धी, नित्यनूतन शोध शाश्वत नीती अंगीकारून ज्या कंपन्यांनी आपले बहुमोल योगदान दिले आहे, अशा कंपन्यांना हा पुरस्कार दिला जातो.

जैन इरिगेशनने आपल्या व्यवसायाच्या प्रक्रियेत कार्यप्रणालीत एक उद्योग म्हणून शाश्वत मूल्ये अंगीकारून कंपनीचा जागतिक पातळीवर विकास विस्तार साध्य केला. त्याचबरोबर नित्यनूतन संशोधनातून बहुमोल पाण्याची बचत साध्य करणारे तंत्रज्ञान विकसित करून ते सर्वसामान्य शेतकऱ्यांना त्यांच्या छोट्या-छोट्या गरजेनुरूप उपलब्ध करून दिले. तसेच शाश्वत विकासाच्या दृष्टीने कंपनीने आपल्या कार्यप्रणालीद्वारे अल्पभूधारक असलेल्या लाखो शेतकऱ्यांना उच्च कृषी तंत्रज्ञानाचा मार्ग उपलब्ध करून दिला. त्यामुळे त्या शेतकऱ्यांना चार पैसे जास्त मिळून त्यांच्या जीवनात परिवर्तन घडून आले, त्यामुळे जैन इरिगेशनचा सन्मान केला.