आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विभागातील २२ ठिकाणी पाेस्ट काेअर बँकिंग सेवा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - भारतीयडाक विभागाने ग्राहकांना व्यापक सुविधा देण्यावर भर दिला अाहे. भुसावळ विभागातील तब्बल २२ ठिकाणी उपपोस्ट कार्यालयांमध्ये पोस्टल कोअर बँकिंगची सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेतून बँकांतून मिळणारे सर्व प्रकारचे लाभ ग्राहकांना मिळणार आहेत.

भारतीय टपाल विभागाचे भुसावळ शहरात विभागीय कार्यालय आहे. या कार्यालयांतर्गत जामनेर, बाेदवड, भुसावळ, मुक्ताईनगर, रावेर, यावल, चोपडा आणि जळगाव तालुक्यातील नशिराबाद आदी प्रमुख तालुके आणि गावांचा समावेश होतो. पोस्ट विभागाचे या विभागात तब्बल ३५ उपकार्यालये आहेत. यातील २२ कार्यालये संगणकाने जोडून यातून ग्राहकांना कोअर बँकिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. एखाद्या व्यक्तीने दिल्लीतील पोस्ट कार्यालयात आपल्या नावे पैसे ठेवले असतील, तर ती रक्कम भुसावळ विभागातील कोअर बँकिंग झालेल्या कोणत्याही कार्यालयातून काढता येईल. यासह याच माध्यमातून ‘मनी ट्रान्सफर’ योजनेच्या माध्यमातून आपल्या खात्यावरील रक्कम इतर व्यक्तीच्या खात्यावरही वर्ग करता येणार आहे. आता पोस्टाच्या कार्यालयांना आगामी काळात बँकिंगचे स्वरूप येणार असल्याचे यातून दिसून येत आहे. याच माध्यमातून शहरातील मुख्य पोस्ट कार्यालयात प्रथमच कोअर बँकिंग एटीएम सुविधा सज्ज होत आहे. सध्या हे काम अंतिम टप्प्यात असून येत्या आठवडाभरातच शहरातील ग्राहकांना एटीएम सुविधा मिळेल.

आठवडाभरात मिळेल सुविधा :विभागात २२ ठिकाणी कोअर बँकिंग झाल्यानंतर आता भुसावळ ऑर्डनन्स फॅक्टरी, मुक्ताईनगर शहर विभाग कार्यालय, रावेर शहर आणि चोपडा येथे कोअर बँकिंग सुविधा मिळणार आहेत. यातील भुसावळ येथे १८ जानेवारी रोजी या यंत्रणेचे काम पूर्ण होईल, तर उर्वरित ठिकाणी २५ जानेवारी रोजी या यंत्रणेतील सर्व कामे पूर्ण होणार असून या कार्यालयांतूनही ग्राहकांना कोअर बँकिंगच्या सुविधा उपलब्ध होतील.

येथे सुविधा : यावलतालुका - भालोद, साकळी यावल शहर, भुसावळ तालुका - भुसावळ एचओ,आठवडे बाजार शाखा, शिवाजीनगर, कुऱ्हेपानाचे, जामनेर तालुका - जामनेर शहर, नेरी, पहूर, शेंदुर्णी, वाकडी, मुक्ताईनगर तालुका - मुक्ताईनगर एचओ विभाग कार्यालय, कुऱ्हा काकोडा, रावेरातील चिनावल, खिरोदा, खिर्डी, निंभोरा, सावदा, थोरगव्हाण, चोपडा तालुक्यातील अकुलखेडा, नशिराबाद अशा २२ ठिकाणी सुविधा कोअर बँकिंग सुरू झाली आहे.

५० रुपयांत एटीएम कार्ड
ग्राहकांना केवळ ५० रुपयांमध्ये एटीएम दिले जाणार आहे. पोस्टातील खात्यावर असलेली रक्कम ते या एटीएमच्या माध्यमातून कोणत्याही वेळी काढू शकतात. मात्र, इतर बँकांतील खात्यांवर असलेली रक्कम या एटीएममधून काढता येणार नाही. पुढील टप्प्यात पोस्टाचे एटीएम इतर बँकांनाही कनेक्ट करण्याचा प्रयत्न होणार आहे.

कार्यालये इंटरनेटने जोडली : भुसावळविभागात ३५ ठिकाणी पोस्ट उपकार्यालये आहेत. यांच्या अंतर्गत खेड्यापाड्यांवर पोस्ट कार्यालये आहेत. विभागात ३५ ठिकाणी असलेल्या या कार्यालयांना इंटरनेटच्या माध्यमातून जोडले जाईल. यातील २२ ठिकाणची जोडणी पूर्ण झाली. आगामी काळात उर्वरित सर्व कार्यालये जोडले जातील.

कोअर बँकिंगचे राज्यात ६५ टक्के काम पूर्ण
^पोस्टकार्यालयाच्याकोअर बँकिंग यंत्रणेचे काम वाढत आहे. गेल्या महिन्याच्या अखेरपर्यंत राज्यातील तब्बल ६५ टक्के कार्यालये कोअर बँकिंगची सुविधा देत आहेत. येत्या मार्च महिन्यापर्यंत हे प्रमाण ७५ टक्क्यांपेक्षा अधिक असेल. त्यामुळे नागरिकांना अधिक सुविधा मिळेल. डी. एस. पाटील, सुप्रिटेंडंटऑफ पोस्ट ऑफिस, भुसावळ