आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोस्टाचे सर्व्हर डाऊन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - शहरातील भुसावळ कचेरी सब पोस्ट ऑफिसमध्ये शनिवार आणि सोमवारीदेखील ऑनलाइन संगणकाच्या सर्व्हरमध्ये बिघाड निर्माण झाल्याने ट्रान्झेक्शन ठप्प झाले. आरडी, सेव्हिंग अकाऊंट आणि डिपॉझिटच्या रकमा ग्राहकांना काढता न आल्याने अनेक व्यवहार ठप्प झाले.

शहरात 48 प्रभागांत तब्बल 145 पतसंस्था होत्या. पतसंस्था डबघाईस आल्यानंतर पोस्टांमध्ये गुंतवणूक करण्याची मानसिकता वाढली. व्याजाची रक्कम कमी मिळत असली तरी गुंतवणूक सुरक्षित असल्याने जिल्ह्यात सर्वाधिक ठेवी भुसावळ शहरातील पोस्ट कार्यालयात आहेत. शनिवारी सर्व्हर डाऊन झाल्याने आर्थिक व्यवहार ठप्प झाले. सोमवारी आर्थिक व्यवहार पूर्ण होतील, अशी आशा ग्राहकांना होती. मात्र, सोमवारी दुपारी 1 वाजेपर्यंतदेखील सर्व्हरची दुरुस्ती झाली नाही. ग्राहकांनी याबाबत संताप व्यक्त करून पोस्टातून काढता पाय घेतला. शनिवारी सर्व्हर डाऊन, रविवारी साप्ताहिक सुटी, सोमवारी सर्व्हरमध्ये तांत्रिक दोष निर्माण झाला होता.