आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काट्याच्या लढतींमध्ये टपालाचे मतदान ठरणार निर्णायक!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- सर्वचपक्ष विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरल्याने मतदारसंघांतील प्रमुख राजकीय दिग्गज मंडळी एकमेकांविरोधात उभी ठाकली आहे. परिणामी, चार ते पाच पक्ष आणि अपक्ष यांच्यात मतांची विभागणी होणार असल्याने निवडून येणाऱ्या आणि पराभूत होणा-या उमेदवारांमध्ये फारच कमी मतांचा फरक दिसेल. त्यामुळे उमेदवारांसाठी एक-एक मत महत्त्वाचे असणार आहे. त्यादृष्टीने जिल्ह्यातील सैन्यातील साडेसहा हजार मतदार आणि निवडणुकीच्या कामासाठी असलेल्या ३० हजार कर्मचाऱ्यांची मते निर्णायक ठरणार आहेत. जिल्ह्यातील 11 मतदारसंघांतील 6, 619 मतदार सैन्यात असून, या मतदारांचे मतदान निर्णायक ठरणार आहे. अर्ज माघार चिन्हवाटपानंतर तातडीने मतपत्रिका छापण्यात आल्‍या. अर्ज माघारीनंतर 48 तासांच्या आत टपालाद्वारे मतपत्रिका पाठवणे आवश्यक असते. त्यामुळे गुरुवारी निवडणूक यंत्रणेकडून या मतपत्रिका पोस्टाद्वारे सीमेवर पाठवण्यात आल्‍या.
महसूलयंत्रणा जोमाने लागली कामाला
महसूलयंत्रणा आणि इतर शासकीय विभागांचे कर्मचारी, पोलिस असे एकूण ३० हजार कर्मचारी निवडणूक कामासाठी उपयोगात येणार आहेत. येत्या रविवारी आणि सोमवार त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार असून, या कर्मचा-यांना मतदानदेखील निर्णायक ठरणार आहे.