आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंधरा मिनिटांच्या पावसाने जळगाव शहर बुडाले अंधारात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - पाऊस आणि वीजपुरवठा खंडित होण्याचे जणू सूत्रच झाले आहे. शुक्रवारी रात्री वाजेच्या सुमारास सुरू झालेल्या पावसामुळे नेहमीप्रमाणे शहरातील बहुसंख्य भागात वीजपुरवठा खंडित झाल्याचा अनुभव जळगावकरांना आला.
दिवसभर तापमानाचा पारा चढलेला असताना सायंकाळी अचानक वातावरणात बदल व्हायला लागला. सुरुवातीला शहराच्या उपनगरांमध्ये हजेरी लावलेल्या पावसाने रात्री वाजेच्या सुमारास शहराच्या मध्यवर्ती भागात हजेरी लावली.
सुमारे १५ ते २० मिनिटे कोसळलेल्या पावसाने शहरातील रस्ते ओले केले. परिणामी, वातावरणात गारठा निर्माण झाला होता. तसेच विजांचा लखलखाट सुरूच होता. १५ मिनिटांच्या पावसामुळे रामानंदनगर, गणेश कॉलनी, नवीपेठ, जिल्हापेठ यासह शहरातील अनेक उपनगरात रात्री सुमारे तासभर अंधार होता.