आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंधनाच्या तुटीमुळे भारनियमनाचे संकट, दोन हजार मेगावॅट वीजपुरवठा कमी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- कोळसागॅसच्या तुटीमुळे महावितरणला रोज सुमारे हजार मेगावॅट वीज कमी मिळत आहे. परिणामी सणासुदीच्या काळात भारनियमन केले जात असल्याने नागरिकांचा रोष वाढत आहे. कोळशाचे प्रमाण अगदी निम्म्यावर आल्याने निर्मितीत घट झाल्याचे महावितरण कंपनीचे म्हणणे आहे.
भुसावळातही कोळसा संपला
महानिर्मितीला रोज ३२ कोळशाचे रॅक आवश्यक असताना केवळ १५ रॅक उपलब्ध होत आहेत. खापरखेडा, पारस, भुसावळ या केंद्रांत केवळ एक ते अर्ध्या दिवसाचा कोळसा शिल्लक आहे. तर चंद्रपूर महाऔष्णिक केंद्रात अडीच दिवसाचा साठा आहे. सर्वच केंद्रात कोळशाची स्थिती बिकट असल्याने वीज निर्मितीवर परिणाम झाला आहे. विजेच्या मागणीतही वाढ सच्या उपलब्धेतही अडचणी आहेत, १९५० मेगावॅटचा रत्नागिरी गॅस प्रकल्प बंदच आहे. उरण केंद्रात १५० मेगावॅट वीजनिर्मिती कमी झालेली आहे. अदानी प्रकल्पातून केवळ १५०० ते १७०० मेगावॅट वीज मिळत आहे. यातच हवामानाच्या अनिश्चिततेमुळे १५ दिवसांत विजेची मागणी १५०० मेगावॅटने वाढली आहे.