आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनैतिक संबंध ठरले खुनाचे कारण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - मृत प्रशांतचा चुलतभाऊ भागवत जनार्दन सोनवणे याने पोलिस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात नगरसेवक कैलास सोनवणे, त्यांचा भाऊ प्रल्हाद सोनवणे, विलास सोनवणे, नरेंद्र सपकाळे, लक्ष्मी नरेंद्र सोनवणे, संजय सपकाळे, संजय साळुंखे, भारती सोनवणे, आदेश सोनवणे, नंदू सोनवणे, विशाल सोनवणे, जयदीप सोनवणे हेच प्रशांतचे मारेकरी असून, त्यांना अटक करण्याची मागणी केली.
प्रशांत हा 22 वर्षांचा तरुण दिसायला चांगला होता. त्याचे कैलास सोनवणे यांच्या मामेभावाच्या पत्नीशी अनैतिक संबंध होते. त्यातूनच दोन महिन्यांपूर्वी कैलास व नरेंद्र सपकाळे यांच्यासह काही नातेवाइकांनी प्रशांतला धमकावले होते. त्यानंतर चार दिवसांपूर्वीच नरेंद्रने प्रशांतला घरी बोलावून शिवीगाळ व दमबाजी केली होती. त्या वेळी कैलास व त्यांचा भाऊ विलासही तेथेच होते.
कैलास सोनवणे मुख्य सूत्रधार
- प्रशांत गायब झाल्याच्या रात्री शनिवारी त्याची आई राधाबाई सोनवणे यांनी घरकुल प्रकरणातील आरोपी नगरसेवक कैलास सोनवणे यांना घरी येताना व नंतर कारमधून शेळगावकडे जाताना पाहिल्याचा दावा केला आहे. कैलास सोनवणे जिल्हा रुग्णालयात असताना रात्री घरी येत होते. त्यामुळे खुनामागील खरा सूत्रधार कैलास सोनवणेच असल्याचा आरोप प्रशांतच्या आईने केला.
सोनवणे-सपकाळे नातेवाईक - प्रशांतला अनैतिक संबंधातून धमकावणारे नगरसेवक कैलास सोनवणे व नरेंद्र सपकाळे हे दोघे मामे-आतेभाऊ आहेत. सोनवणे यांना वाळूच्या ठेक्यात नरेंद्र मदत करतो. प्रशांतच्या घरासमोरच नरेंद्रचे घर आहे. अनैतिक संबंधातूनच प्रशांतचा या दोघांनी काटा काढल्याचा आरोप त्याचा भाऊ सुभाष सोनवणे याने केला आहे.