आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रशांत सोनवणे खून प्रकरणी कैलास सोनवणेंची कारागृहात चौकशी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - रिधूरवाड्यातील प्रशांत सोनवणे याच्या खुनात मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप असलेले नगरसेवक कैलास सोनवणे यांची शुक्रवारी पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशाने कारागृहात जाऊन चौकशी केली. पोलिसांनी या प्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सक एस. एन लाळीकर यांचीही चौकशी केली.
प्रशांतचा खून झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्याच्या नातेवाइकांनी कैलास सोनवणे यांच्यासह त्यांचा भाऊ प्रल्हाद, विलास, नंदकिशोर सपकाळे, नरेंद्र सपकाळे, लक्ष्मी सपकाळे, भारती सोनवणे, सागर सोनवणे, जयदीप सोनवणे यांचाही सहभाग असल्याचा आरोप केला. प्रशांतच्या नातेवाइक ांनी जिल्हा रुग्णालयाच्या कैदी वार्डात असलेल्या कैलास सोनवणेंवर हल्लाही चढविला होता. याशिवाय रिधूरवाड्यातील कैलास सोनवणेंच्या घरावर दगडफेकही केली गेली. त्यामुळे पोलिसांनी कैलास सोनवणे यांच्या परिवारातील चार जणांसह एकूण सहा लोकांना ताब्यात घेतले होते. हे सहाही जण अद्यापही पोलिसांच्या ताब्यात आहेत.
तपासाधिकारी पोलिस उपअधीक्षक विवेक पानसरे यांनी शुक्रवारी नगरसेवक कैलास सोनवणे यांची कारागृहात जाऊन चौकशी करण्यासाठी परवानगी मिळावी, असा अर्ज न्यायालयात केला होता. न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर सायंकाळी पानसरे यांनी स्वत: कारागृहात जाऊन सोनवणे यांची तब्बल दोन तास चौकशी केली. चौकशीदरम्यान सोनवणे यांना खून प्रकरणाबाबत प्रo्न विचारले गेले. कैलास सोनवणे यांचा खुनात सहभाग आहे का? याबाबत पोलिसांनी पडताळणी केली. प्रशांत गायब झाला त्या दिवशी कैलास सोनवणे कोठे होते, याचीही चौकशी केली गेली.
जिल्हा शल्यचिकित्सकांची भेट - पानसरे यांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन शल्यचिकित्सक लाळीकर यांचीही भेट घेतली. कारागृहातून रुग्णांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्याची नेमकी पद्धत काय असते, याची पानसरेंनी माहिती घेतली. त्याचबरोबर कैलास सोनवणे यांना कोणत्या कारणाने व किती दिवस दाखल करण्यात आले होते, याचेही रेकॉर्ड तपासण्यात आले.
सीसीटीव्ही फुटेज तपासणार - जिल्हा रुग्णालयात दाखल असलेले कैलास सोनवणे हे कोठडीत असताना घरी जात असल्याचा आरोप प्रशांतच्या नातेवाइकांनी केला होता. प्रशांतच्या नातेवाइकांनी केलेला आरोप खरा आहे का? हे पडताळून पाहण्यासाठी पानसरे यांनी जिल्हा रुग्णालयात बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍याचे फुटेजदेखील रुग्णालय प्रशासनाकडे मागितले आहे.
मोबाइल रेकॉर्ड देखील काढले - ज्या लोकांवर प्रशांतचा खून केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे त्या लोकांचे मोबाइल कॉल्सचे रेकॉर्ड पोलिसांनी काढले आहे. हे रेकॉर्ड पोलिस पडताळून पाहणार आहेत. मोबाइल कॉल्सच्या डिटेल्सवरून या खून प्रकरणातील सत्य बाहेर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
मोटारसायकल, व्हॅन जप्त - या गुन्ह्यात आरोपी नरेंद्रने वापरलेली मोटारसायकल व ओमनी मारुतीकार पोलिसांनी शुक्रवारी जप्त केली. नरेंद्रने ज्या मोटारसायक लवरून प्रशांतचा मृतदेह नेला होता ती मोटारसायकल व ज्या ओमनीतून हा मृतदेह वाहून नेण्यात आला, ती कारही जप्त केली गेली.
प्रशांतच्या मारेकर्‍यांना पुन्हा तीन दिवसांची कोठडी - रिधूरवाड्यातील तरुण प्रशांत सोनवणे याचा खून करून जाळून टाकणार्‍या तिघा जणांच्या पोलिस कोठडीची मुदत शुक्रवारी संपल्यामुळे त्यांना न्यायालयात हजर केले असता, तिघांना न्यायाधिश ए. बी. ओढावढेकर यांनी पुन्हा तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
प्रशांतच्या खून प्रकरणात पोलिसांच्या हाती ज्या लाकडी दांड्याने व चाकूने प्रशांतचा खून करण्यात आला ते साहित्य जप्त केले. त्याचबरोबर पोलिसांनी मारेकरी नरेंद्र याच्या घरात मिळालेले रक्ताचे डाग व कपडेदेखील ताब्यात घेतले आहेत. दरम्यान पोलिस कोठडीत असलेले नरेंद्र, त्याची प}ी लक्ष्मी व त्याचा मित्र प्रदीप यांच्या कोठडीची मुदत संपल्यामुळे त्यांना शुक्रवारी दुपारी पोलिसांनी मोठय़ा पोलिस बंदोबस्तात तिघांना न्यायालयात हजर केले असता, न्यायाधीश ओढावढेकर यांनी त्यांच्या पोलिस कोठडीत सोमवारपर्यंत वाढ केली आहे.
तिघा आरोपींच्या पोलिस कोठडीबाबत न्यायालयात कामकाज सुरू असताना मयत प्रशांतची आई अनुसयाबाई हीने भरन्यायालयात अचानक वकिलांच्या रांगेतून उभे राहून न्यायाधीश साहेब मला न्याय द्या, अशी हाक लावली. प्रशांतची आई अनुसयाबाई हिचा आवाज ऐकताच न्यायालयात एकदम शांत झाले होते. अनुसयाबाईने न्यायाधीशांना उद्देशून पोलिस व इतर कोणीही सहकार्य करीत तपास नीट करीत नसल्याचा आरोप करीत न्यायाधीशांना लेखी निवेदन दिले. 10 मुद्यांवर त्यांनी दिलेल्या निवेदनात विश्लेषण करण्यात आले आहे. नगरसेवक कैलास सोनवणे यांचेसह त्याचा परिवाराचादेखील माझ्या मुलाच्या खुनात हात असताना पोलिस सोयीस्कररीत्या याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोपही त्यांनी निवेदनातून केला आहे.
अनुसयाबाई हीने दिलेल्या निवेदनाची गंभीर दखल घेत न्यायाधीश ओढावढेकर यांनी त्या निवेदनावर पोलिसांना लेखी म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या तिघांना न्यायालयात आणल्यानंतर बघ्यांची मोठी गर्दी न्यायालय परिसरात जमली होती.
कार्यकर्ते पोसण्यासाठी नगरसेवकांचा आग्रह - महापालिकेचे बहुसंख्य रोजंदारी कर्मचारी हे नगरसेवकांचे नातेवाईक, कार्यकर्ते असून सोयीच्या ठिकाणी नेमणूक करून जणू त्यांना पोसण्याचेच काम प्रशासन करीत असल्याची बाब लक्षात आली आहे. यात प्रामाणिक काम करणार्‍यांची अडचण होत असून आठवडाभराच्या सह्या करून पगार घेणार्‍यांना जणू संबंधित अधिकार्‍यांचाच वरदहस्त असल्याचे स्पष्ट झाले आहे. अनेकांनी तर न्यायालयाचीच दिशाभूल करत नोकरी मिळविल्याचे दबक्या आवाजात बोलले जात आहे.
सन 1990 नंतर शासनाने नोकर भरतीला तसेच रोजंदारीला मनाई केली होती. त्यामुळे नगरपालिकेतील पदाधिकार्‍यांनी आपल्याच जवळच्या नातेवाइकांना व कार्यकर्त्यांना न्यायालयात अर्ज करण्याचा सल्ला दिला. त्यात मनपाचे रोजंदारी कर्मचारी असल्याचे नमूद करण्यात आले. विशेष म्हणजे न्यायालयात साक्षीसाठी जाणारे कर्मचारी हे अर्जदाराच्या रोजंदारीसंदर्भात कोणतेही पुरावे सापडत नसल्याची साक्ष देत असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी दिले. या अर्जदारांना सामावून घेण्यात प्रशासनाचाच मोठा हात असल्याने कोणत्याही प्रकारचा रोजंदारी कामगार नसताना न्यायालयाची दिशाभूल करत न्यायालयीन कर्मचारी म्हणून मनपाच्या सेवेत दाखल झाले आहेत.