आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साेनवणे खून खटला; आराेपींनी ३८ कागदपत्रेही नाकारली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - प्रशांत सोनवणे खून खटल्यातील सर्वच्या सर्व १३ आरोपींनी गुन्हा कबूल नसल्याचे सांगितले असून सरकारपक्षातर्फे देण्यात आलेली ३८ कागदपत्रेही आरोपींनी नाकारली आहेत. याप्रकरणी आता पुढील सुनावणी १५ दिवसांनंतर ठेवण्यात आली आहे. शुक्रवारच्या सुनावणीवेळी ११ आरोपी िजल्हा न्यायालयात हजर होते.

गेल्या महिन्यात २४ एप्रिल रोजी प्रशांत सोनवणे खून खटल्याप्रकरणात नगरसेवक कैलास साेनवणेंसह १३ जणांवर न्यायाधीश एम. क्यू. एस. एम. शेख यांच्या न्यायालयात खुनाच्या आराेपाची निश्चिती करण्यात आली. या वेळी सर्व आराेपींनी गुन्हा कबुल नसल्याचे सांिगतले होते. सरकारपक्षातर्फे अ‍ॅड. सुरेंद्र काबरा यांनी त्या दिवशी आराेपीच्या वकिलांना ३८ कागदपत्रे दिली हाेती. या कागदपत्रामध्ये नमूद केलेला घटनेचा तपशील, इतर बाबी आणि आरोपही शुक्रवारी झालेल्या सुनावणीत आरोपींनी फेटाळले.

साेनवणे खून खटल्यात सरकारपक्षातर्फे १३ आराेपींच्या वकिलांना ३८ कागदपत्रे देण्यात आली. मात्र, ही कागदपत्रे मान्य नसल्याचा युक्तिवाद बचावपक्षातर्फे शुक्रवारी झालेल्या सुनावणीत करण्यात आला. सरकारपक्ष आता ३८ कागदपत्रे सिद्ध करण्याच्या तयारीत आहे. या प्रकरणात पुढील सुनावणी शुक्रवार, २२ मे राेजी हाेणार आहे. सरकारपक्षातर्फे अ‍ॅड. काबरा तर बचावपक्षातर्फे अ‍ॅड. अकिल इस्माईल, अ‍ॅड. पद्मनाभ देशपांडे, अ‍ॅड.आर.के. पाटील यांनी काम पाहिले. पुढील सुनावणीत काय हाेते याकडे आता लक्ष लागले आहे
बातम्या आणखी आहेत...