आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मू.जे. महाविद्यालयास ‘पुरूषोत्तम', प्रताप महाविद्यालयाने मिळवला सलग पाचव्यांदा द्वितीय पुरस्कार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- परिवर्तनसंस्था महाराष्ट्र कलोपासक मंडळ (पुणे) आयोजित पाचव्या पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेचा बुधवारी समारोप झाला. त्यात चौथ्या वेळेस मूळजी जेठा महाविद्यालयाच्या ‘दमडी’ एकांकिकेने प्रथम पुरस्कार पटकावला. तसेच प्रताप महाविद्यालयाने (कस्टमर केअर) सलग पाचव्यांदा द्वितीय क्रमांक मिळवला. औरंगाबाद येथील देवगिरी महाविद्यालयाचे ‘ग्‍लोबल आडगाव' हे नाटक तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले.
चार दिवस चाललेल्या या स्पर्धेत ३२ एकांकिका सादर झाल्या. समारोपाअगोदर ‘अनुभूती-२’च्या विद्यार्थ्यांनी शेतकरी, रणपा नृत्य, पपेट शो ‘अनुभूती-मुख्य’च्या विद्यार्थिनींनी मणिपुरी नृत्य सादर केले. तसेच अर्चना चौधरी, अंकिता ठाकूर, जास्मिन गाजरे यांनी शास्त्रीय ग्लॅडिएटर डान्स ग्रुपच्या मुलांनी ‘देवा श्रीगणेशा..’वर नृत्य सादर केले. भूमी फाउंडेशनच्या मुलांनी तयार केलेले रंगभूमी गीताचे वेगळ्या प्रकारे सादरीकरण झाले, तर विनोद प्रजापत यांनी रफीच्या आवाजात गीतगायन केले.
या वेळी संजय कापडणीस म्हणाले की, 64 कलांपैकी नाट्यकला एखादा चांगला विषय लोकांपर्यंत पोहचोवले. कलाकार नेहमी बंदिस्त एकटा असतो, असे मानले जाते. मात्र, इथे आल्यावर तो काय आहे याची प्रचीती येते. चांगला कलावंत तोच असतो, ज्याच्यातील कार्यकर्ता आणि माणूस आयुष्यभर जिवंत राहतो. त्यामुळे तरुण कलावंतांनी व्यसनांच्या आहारी जाऊ नये.
या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून मनपा आयुक्त संजय कापडणीस, दलिचंद जैन, संगीता पाटील, पीपल्स बंॅकेचे अनिल पाटकर, प्रा.डॉ.प्रीती अग्रवाल, नीलेश पाटील, मृणाल काळसेकर, परीक्षक प्रदीप वैद्य, अंजली धारू, राजकुमार तांगडे, स्टेट बॅंकेचे रिजनल मॅनेजर अशोककुमार गुप्ता उपस्थित होते. याप्रसंगी ज्येष्ठ रंगकर्मी डॉ.मुकुंद करंबेळकर, जगदीश नेवे, सुलभा कुळकर्णी, महाराष्ट्र कलोपासक मंडळाचे मयूर देशमुख जयंत चिंचोले यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
तसेच संजय निकुंभ, चिंतामण पाटील, निनाद पाठक, चित्रकार सुशील चौधरी, अखिल तिलकपुरे, ज्ञानेश्वर सोनवणे, गायत्री जोशी, विद्या चौक, मोहिनी उपासनी हेमंत पाटील यांचाही सत्कार करण्यात आला. हर्षल पाटील यांनी सूत्रसंचालन केले, तर मंगेश कुळकर्णी यांनी आभार मानले. स्पर्धेला भवरलाल अँड कांताबाई जैन मल्टिपर्पज फाउंडेशनचे सहकार्य मिळाले.