आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेचैनीत जगा अन् चैनीत मरा, साहित्यिक प्रवीण दवणे यांचा विद्यार्थ्यांना सल्ला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कवयित्री बहिणाबाईनगर, जळगाव- देशाला चांगल्या विचारवंतांची, नव्या निष्ठावंतांची गरज आहे. ती तुमच्या रूपाने पूर्ण होऊ द्या. चिंतन करा, स्वत:ची क्षमता ओळखण्याची ताकद निर्माण करा. अजून मला उमलायचेय, फुलायचेय ही बैचेनी असली पाहिजे. म्हणूनच बेचैनीत जगा आणि चैनीत मरा असा सल्ला साहित्यिक प्रवीण दवणे यांनी विद्यार्थीसाहित्यिकांना दिला.

प्रतिभा संगम राज्यस्तरीय विद्यार्थी साहित्य संमेलनाच्या दुसर्‍या दिवसाची सुरुवात ‘वय वादळविजांचे’ या विषयावरील प्रवीण दवणे यांच्या व्याख्यानाने झाली. तब्बल दीड तास नवोदित साहित्यिकांना केंद्रस्थानी ठेवून तरुण वयाच्या वादळाला कशी दिशा द्यायची याची अनेक उदाहरणे दिली. त्यांच्या भाषणाने विद्यार्थी भारावून गेले. टीप कागदं ठेवणं हे साहित्यिक होण्यासाठी फायद्याचं. आचार्य अत्रे यांचे मी कसा घडलो हे पुस्तक वाचले आणि त्यातून प्रेरणा मिळाली.

काम ऊज्रेचे रूपांतर राम ऊज्रेत व्हायला हवे. त्याची प्रचंड गती, प्रगती असली पाहिजे; पण आजच्या रेडिमेडच्या जमान्यात यशाची राईसप्लेट तयार मिळत नाही. त्याचा प्रत्येक दाणा मेहनतीने शिजवावा लागतो हे विसरून चालणार नाही. प्रत्येक तरुण नेहमी उत्सुक, सशक्त आणि चांगलं करू इच्छिणाराच असतो. त्याला योग्यवेळी चांगला मार्गदर्शक न मिळाल्यास तो भरकटतो. प्रत्येकाच्या आयुष्यात एखादा दीपस्तंभ अथवा मार्गदर्शक मिळणे गरजेचे आहे.

आपला देश सर्वोच्च स्थानी न्यायचा आहे हे ध्येय उराशी बाळगून कितीही संकटे आली तरी न डगमगता प्रय} केले पाहिजेत; पण आज निष्ठा विक ण्याचे जग आहे. ती विकून माणूस उच्च पदावर जात आहे; पण माणूस मोठा असेल तरच ते पद मोठे होते. एखाद्या पदाने माणूस मोठा होत नसतो, असे दवणे म्हणाले.