आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जामनेरच्या गर्भवती महिलेचा ‘स्वाइन फ्लू’मुळे मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जामनेर - जामनेरात गर्भवती महिलेस स्वाइन फ्लू झाला हाेता. बुधवारी औरंगाबादला उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. १० दिवसांत त्या प्रसूती हाेणार हाेत्या. 
 
येथील सुनंदा सुनील गाणार (वय ३७) यांना स्वाइन फ्लूची लक्षणे दिसून अाल्यामुळे जळगाव त्यानंतर औरंगाबादला उपचारासाठी पाठवले. बुधवारी उपचार सुरू असतानात त्यांच्या मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पती, सासू, सासरे, दोन मुली असा परिवार आहे. शिवाजीनगर परिसरातील रहिवासी असलेल्या विमल महाजन, लता महाजन तेजस्विनी चौधरी यांनाही स्वाइन फ्लू सदृश लक्षणे दिसून आली. 
 
चाळीसगावातही स्वाइन फ्लू 
चाळीसगावात वनविभागाचे कर्मचारी नितीन अमरसिंग चव्हाण (वय ४०)यांना स्वाइन फ्लू झाल्याचे स्पष्ट झाले अाहे. 
बातम्या आणखी आहेत...