आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आचारसंहितेपूर्वी कामे उरकण्यावर विद्यमान नगरसेवकांचा भर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - महापालिकेच्या निवडणुकीसाठी आचारसंहिता आज लागेल उद्या लागेल, या प्रतीक्षेत असलेल्या विद्यमान नगरसेवकांनी पाच वर्षांत होऊ न शकलेल्या कामांना तातडीने मंजुरी घेत आपली हुशारी दाखवली आहे. त्यामुळे सद्य:स्थितीत शहरात वर्कऑर्डर घेऊन सुमारे तीन कोटींच्या कामांचा र्शीगणेशा झाला आहे. फटका सार्वजनिक हितासाठी वापरण्यात येणार्‍या 31 लाखांच्या मुतार्‍यांच्या कामाला बसणार असून यासाठी आता 43 दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

महापालिकेची खालावलेली पत त्यात कर्जांचा डोंगर यामुळे गेल्या चार वर्षांत राज्य असो की, केंद्र सरकारकडून कोणत्याही प्रकारचा निधी न आल्याने मनपा फंडातून मिळणार्‍या निधीवर अवलंबून राहावे लागत होते. गत काही वर्षांत शहरात अपेक्षित कामे होऊ न शकल्याने नागरिकांचीही ओरड सुरू होती. परंतु गेल्या चार महिन्यांपूर्वी आलेल्या 10 कोटींचा निधी महापालिकेला नवसंजीवनी देणारा ठरला.

सद्य:स्थितीत शहरातील सर्वच भागातील रस्त्यांच्या डांबरीकरणासह महत्त्वाच्या कामांचे वर्कऑर्डर देण्यात आले आहेत. आचारसंहिता केव्हाही लागण्याची शक्यता लक्षात घेता नगरसेवकांनी कामांना ब्रेक लागायला नको म्हणून तातडीने कामे सुरू केली होती. त्यात काही भागात पावसातही रस्त्यांसाठी डांबर वितळण्याचे काम हाती घेण्यात आल्याचे दिसले. विभागीय आयुक्तांकडून मंजुरी मिळालेल्या 3 कोटी 5 लाखांच्या वैशिष्ट्यपूर्ण कामे सुरू असल्याने या कामांना आचारसंहितेचा कोणताही अडथळा नसल्याचे सांगितले जात आहे.


मुतार्‍यांच्या कामाला फटका
संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानांर्तगत 2004 पासून टप्प्याने प्राप्त झालेला 31 लाखांचा निधीतून करण्यात येणार्‍या मुतार्‍यांच्या कामांचा खोळंबा झाला आहे. शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची समस्या असलेल्या मुतार्‍यांच्या कामांना या आचारसंहितेचा फटका बसणार आहे. त्याचप्रमाणे जवळजवळ सर्वच नगरसेवकांनी त्यांच्या वॉर्डातील नागरिकांना खुश करण्यासाठी कामे सुरू क रून घेतल्याने अनेकांच्या डोक्याचा ताण कमी झाला आहे. परंतु आजही बर्‍याच वॉर्डात आमदार व खासदार निधीतील कामे मंजूर आहेत. परंतु पेमेंट अडकण्याच्या भीतीपोटी कंत्राटदार कामे हाती घेत नसल्याने आजपर्यंत सुरू न झालेल्या कामांचा शुभारंभ होऊ शकणार नाही.