आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांवर दरोड्याचा गुन्हा लावणे चुकीचेच, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचे मत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - जिल्हाबँकेत पीक विम्याच्या लाभाच मागणी करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांवर दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. हा प्रकार अत्यंत चुकीचाच असल्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

तापी पाटबंधारे महामंडळाच्या कार्यालयात शुक्रवारी पत्रकार परिषद झाली. या वेळी पत्रकारांनी त्यांना तुम्ही संचालक असलेल्या जिल्हा बँकेत शेतकऱ्यांवर दरोड्याचे गुन्हे दाखल होत असल्याबाबत प्रश्न विचारला हाेता. त्या वेळी ते म्हणाले, बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक पोलिस अधीक्षकांना याबाबत विचारावे लागेल. संघाच्या कार्यक्रमासंदर्भात मी नंदुरबारला गेल्यामुळे याविषयी माहिती नाही. वृत्तपत्रातून कळले. तेव्हा पत्रकारांनी अामदार गुलाबराव पाटील यांना सर्व माहिती असल्याचे सांगितल्यानंतर गुलाबरावांनी सर्व घटनाक्रम महाजन यांना सांगितला.

तरवाडकर यांचा बदली अर्ज मागवला
खुर्चीफेकणाऱ्या शेतकऱ्यांना त्या दिवशी अटक करण्याच्या सूचना पाेलिस अधीक्षकांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक श्याम तरवाडकर यांना दिल्या हाेत्या. पण त्यांनी त्याचे पालन केले नाही म्हणून तरवाडकर यांच्या बदलीचा अर्ज अधीक्षकांनी अपर अधीक्षकांना घ्यायला भाग पाडले आहे. अधीक्षकांनी तरवाडकर यांच्यावर अपयशाचे खापर फोडले आहे. तसेच त्यांच्यावर जिल्हापेठ पोलिस ठाण्यात कामगिरी समाधानकारक नसल्याचा ठपका ठेवला आहे. अधीक्षकांच्या सूचनेनुसार अपर पोलिस अधीक्षकांनी तरवाडकर यांचा अर्ज मागवला असल्याच्या वृत्ताला महाजन यांनी दुजोरा दिला आहे. मात्र, जिल्हा बँक प्रकरण नव्हे तर त्यापूर्वीपासून त्यांची कामगिरी समाधानकारक नसल्याने बदलीचा अर्ज मागवण्याच्या सूचना अधीक्षकांनी पूर्वीच दिल्या आहे.