आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळे शहरात कर्णकर्कश्श हॉर्न वाजविणा-यांवर कारवाई शून्य

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - शहर वाहतूक शाखेतर्फे रस्ता सुरक्षा पंधरवड्यांतर्गत गेल्या 14 दिवसांत वाहतुकीचे नियम मोडणा-या 290 जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात येऊन 31 हजार 600 रुपये वसूल करण्यात आले. विशेष म्हणजे शहरात कर्णकर्कश्श हॉर्न वाजविण्यास बंदी असताना आजही अनेकजण कानठळ्या बसविणा-या हॉर्नचा वापर करतात. त्यानंतरही संबंधितांवर या मोहिमेत कोणतीही कारवाई झालेली नाही.
शहर वाहतूक शाखेतर्फे 1 ते 15 जानेवारी दरम्यान रस्ता सुरक्षा पंधरवडा साजरा करण्यात आला. या काळात शहरात ठिकठिकाणी वाहतूक नियमांबाबत प्रबोधन करण्यात आल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. वर्दळीच्या सुमारे 17 ठिकाणी पोलिसांनी या काळात कारवाईचा फास आवळला. वाहतुकीचे नियम मोडणा-या 290 जणांवर गेल्या 14 दिवसांत कारवाई करण्यात आली. पोलिसांनी केलेली कारवाई अशी, तारीख, कारवायांची संख्या व दंड या क्रमाने : 1 जानेवारी- 38, 3 हजार 800 रुपये, 2 जानेवारी- 31, 3 हजार 200 रुपये, 3 जानेवारी- 41, 4 हजार 500 रुपये, 4 जानेवारी- 36, 3 हजार 900 रुपये, 5 जानेवारी- 9, 900 रुपये, 6 जानेवारी- 7, 2 हजार रुपये, 7 जानेवारी- 5, 500 रुपये, 8 जानेवारी- 7, 700 रुपये, 9 जानेवारी- 15, 1 हजार 700 रुपये, 10 जानेवारी- 26, 2 हजार 600 रुपये, 11 जानेवारी- 7, 700 रुपये, 12 जानेवारी- 4, 400, 13 जानेवारी- 10, 1 हजार, 14 जानेवारी- 54, 5 हजार 700 रुपये.
प्रबोधनाचे धिंडवडे....- वाहतूक नियमांबाबत सप्ताहात जागृती करण्यात आल्याचा दावा वाहतूक शाखेने केला आहे. तथापि सपूर्ण पंधरवड्यात जनजागृतीसाठी ठोस प्रयत्न झाले नाहीत. सप्ताहाच्या सुरुवातीला झालेला उद्घाटनाचा कार्यक्रम एवढीच वाहतूक शाख् करिता जमेची बाजू ठरली.
यांच्यावर झाली कारवाई - विना परवाना, प्रवेशबंदी क्षेत्रात वाहन चालविणे, नंबरप्लेट नसणे, चुकीच्या जागेत वाहन लावणे, ड्रिपलसीट दुचाकी चालविणे, थांबा नसताना प्रवासी बसविणे, मोबाइल संभाषण करणे आदी नियमांचा भंग करणा-यांवर कारवाई करण्यात आली.
सिग्नलचा ‘शो ’ संपला - वाहतूक शाखेने 1 जानेवारीपासून शहरातील शिवतीर्थ चौक, कमलाबाई कन्याशाळा, गिंदोडिया चौक, दत्तमंदिर चौक आदी भागांतील सिग्नल सुरू केले. वाहतुकीची कोंडी सुटेल, अशी अपेक्षा व्यक्त होत होती; परंतु आता हे सिग्नल बंद झाल्याने ‘ ये रे माझ्या मागल्या’ अशी स्थिती झाली आहे.