आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उपवासकर्त्‍यांना स्वस्तात फलाहार, नवरात्रीत सफरचंद, चिकू, केळीचे भाव घसरल्याने भाविकांना दिलासा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- सणासुदीतउपवासाच्या दिवसांत सफरचंद, केळी, चिकू डाळिंबाचे दर घसरल्याने उपवासकर्त्यांना दिलासा मिळाला आहे. या फळांची आवकही मोठ्या प्रमाणात होत असल्याने दर घसरले आहेत. काश्मीरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे सफरचंदची आवक माेठ्या प्रमाणात वाढली आहे. परिणामी हा माल खराब होण्याआधीच विक्री करण्याकडे व्यावसायिकांचा कल दिसून येत आहे. यामुळे ही फळे सर्वसामान्यांच्या आवाक्यात आली आहेत.
उपवासासाठी सफरचंद, केळी, डाळिंब चिकू या फळांना अधिक मागणी असते. यासह दुर्गोत्सवातील प्रसाद पुजेसाठीही फळांना अधिक पसंती दिली जाते. महिन्यापूर्वी फळांचे दर हे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर होते, मात्र काही दिवसांपासून या दरात ४० टक्के घट झाली आहे. दर उतरताच विक्रेत्यांचे प्रमाणही बाजारात वाढलेले दिसून येत आहे. या फळांची अधिकाधिक विक्री करण्याकडे व्यवसायिकांचा कल दिसून येत आहे. दरवर्षी सणासुदीच्या काळात फळांचे भाव वाढत असल्याचा यापूर्वीचा अनुभव विचारात घेता यंदा नैसर्गिक परिस्थितीमुळे अचानक कमी झालेले फळांचे दर सुखद धक्का देणारे आहोत. नवरात्रीचे उपवास करणाऱ्या भाविकांना यामुळे सर्वाधिक लाभ झाला आहे.

दस-यानंतर दरवाढ शक्य

सध्यादुर्गोत्सव असून उपवास सुरू आहेत, यामुळे या फळांना मागणी वाढली आहे. काश्मीरमधून येणारे सफरचंद बलसाड येथून येणारे चिकू यांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे दरात सध्या घट झाली आहे. दसऱ्यानंतर हे दर बदलत्या परिस्थितीनुसार पुन्हा वाढतील, असा प्राथमिक अंदाज आहे. इरफानशेख, फळव्यावसायिक.
असे आहेत सध्याचे दर
गेल्यामहिन्याच्या तुलनेत या फळांच्या किमतीत आता 40 टक्के घट झाली आहे. सफरचंदचे भाव गेल्या महिन्यात 100 ते 120 रुपये किलो होते, यात टिलचंदचा भाव 150 रुपयांपर्यंत होता. आता हा भाव आता 80 रुपये तर साधे सफरचंद 30 ते 40 रुपये किलोवर आले आहेत. चिकूचे भावही 20 ते 30 रुपये किलोपर्यंत आहेत. बलसाड-सूरत येथून त्याची आवक अधिक होत आहे. केळीचे दर 25 ते 30 रुपयांवरून 15 रुपयांपर्यंत खाली आले आहेत. डाळिंबाचा भावही बराच कमी झाला असून 100 रुपयांवरून हा भाव 60 रुपये किलोवर आलेला आहे.