आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीएसटीमुळे 6 महिन्यांत वस्तूंच्या किमती उतरतील, सीए अनिल शाह यांचा विश्वास

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- जीएसटीमध्ये करांवर कर आकारणी नसेल. तसेच खरेदी केलेल्या वस्तू आणि सेवांवर भरलेल्या संपूर्ण सेट ऑफ मिळणार आहे. त्यामुळे येत्या महिन्यात वस्तूंच्या किंमती तीन टक्क्यांनी खाली येतील, असा विश्वास सीए अनिल शाह यांनी व्यक्त केला. 
 
आयएमआर व्यवस्थापन महाविद्यालयात शुक्रवारी जीएसटी विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. या वेळी ते बोलत होते. त्यांनी सन २००० पासून ते २०१७ पर्यंतचा जीएसटीची प्रवास उलगडला. जीएसटीत सर्व काही ऑनलाइन करायचे आहे. यामुळे संगणकीय नोंदी ठेवणे गरजेचे आहे. अनोंदणीकृत पुरवठादारांकडून माल खरेदी केल्यास खरेदीदारास स्वत: जीएसटी भरायचा आहे. त्यामुळे जास्तीत जास्त व्यापारी सेवा पुरवणारे जीएसटीमध्ये नोंदणीकृत होतील. सर्व मुख्य प्रवाहात येतील आणि काळ्या पैशास आळा बसेल, असेही शाह यांनी सांगितले. 
 
या वेळी संचालक प्रा. डॉ.शिल्पा बेंडाळे उपस्थित होत्या. प्रा. श्वेता चोरडिया यांनी सूत्रसंचालन केले. निधी कोठारी यांनी आभार मानले. प्रा. शुभदा कुलकर्णी, प्रा. बी.जे.लाठी यांनी नियोजन केले. 
 
बातम्या आणखी आहेत...