जळगाव- पहिल्यांदा‘गल्ली ते दिल्ली’ पंतप्रधानांशी संवाद साधण्याची संधी मुलांना मिळाली. त्यामुळे मुले उत्सुकतेने भारावून गेली होती. पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी ऊर्जा बचत, पर्यावरण संरक्षणाचा संदेश देत
आपल्या संकल्पना विद्यार्थ्यांपुढे ठेवल्या. त्यांचा उपयोग विद्यार्थ्यांच्या जीवनात होईल, अशा प्रतिक्रिया शिक्षकांमधून उमटल्या. दरम्यान, जळगाव शहरात ८१ हजार ७०३ तर जिल्ह्यातून लाख ३८ हजार ९० विद्यार्थ्यांनी भाषण ऐकले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण एकाचवेळी देशभरातील विद्यार्थ्यांना ऐकवण्यात आले. तब्बल पावणेदोन तास त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ते आपल्याशीच संवाद करीत आहेत, असे विद्यार्थ्यांना भाषण ऐकताना जाणवले. दुपारी ते ४.४५ या वेळेत शाळांमध्ये मोदींच्या भाषणाचा आवाज ऐकू येत होता. एलसीडी प्रोजेक्टरद्वारे शहरातील शाळांमध्ये भाषण ऐकण्याचे नियोजन करण्यात आले होते. यात थेट पंतप्रधानांशी संवाद साधण्याचा पहिल्यांदा राबवलेल्या उपक्रमावर शिक्षक पालकांनी कौतुकाची थाप ठेवली.
हाउपक्रम अत्यंत चांगला होता. पंतप्रधानांच्या मनातल्या संकल्पना विद्यार्थ्यांसमोर आल्या. शिक्षकांप्रमाणे त्यांनी मुलांना अनेक छोट्या छोट्या गोष्टीतून माहिती दिली. पर्यावरण संरक्षण, ऊर्जा बचतीचाही संदेश त्यांनी भाषणातून दिला. रेखापाटील, मुख्याध्यापक,गुरुवर्य प.वि.विद्यालय
पंतप्रधानांचे भाषण साधे आणि विद्यार्थ्यांना सहज कळेल असे होते. एवढ्या मोठ्या व्यक्तीचे भाषण ऐकल्याचा आनंद विद्यार्थ्यांना होता. गुरुंचे महत्त्व, शाळा, निसर्गाकडे त्यांनी मुलांचे लक्ष वेधले. याचा मुलांच्या जीवनात निश्चितच उपयोग होईल. स्वातीपवार, मुख्याध्यापक,प.न. लुंकड कन्या शाळा
मोदींच्या भाषणाने मुलांना खूप माहिती मिळाली. यातून मुलांशी संवाद वाढवला पाहिजे, याची जाणीव प्रत्येक पालकाला झाली असेलच. प्रथमच असा उपक्रम राबवण्यात आला. चांगला उपक्रम असल्याच्या प्रतिक्रिया पालकांमधूनही उमटल्या. डी.के.देवळे, मुख्याध्यापक