आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंतप्रधान उज्ज्वला योजनेतून पाच हजार गॅस कनेक्शन देणार, दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना दिला जाणार लाभ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिरपूर तालुक्यातील बोराडी येथे गॅस कनेक्शनचे वाटप करताना भाजपचे राहुल रंधे, बबन चौधरी आदी. - Divya Marathi
शिरपूर तालुक्यातील बोराडी येथे गॅस कनेक्शनचे वाटप करताना भाजपचे राहुल रंधे, बबन चौधरी आदी.
धुळे - तालुक्यातील रावेर येथे पंतप्रधान उज्ज्वला योजनेंतर्गत दारिद्र्यरेषेखालील २९ कुटुंबांना एलपीजी गॅस जोडणीचे वाटप करण्यात आले. या योजनेतून ५०८ लाभार्थ्यांना गॅस जोडणी देण्यात येणार आहे. या वेळी सरपंच साहेबराव पाटील, उपसरपंच भूषण देवरे, महेंद्र भामरे, माजी सरपंच निंबा देवरे, गोपीनाथ देवरे, जगन देवरे, विश्वनाथ देवरे, संतोष अहिरे, गोरख देवरे, विकास देवरे, अशोक मराठे, देवचंद बेडसे, कैलास पाटील, जगदीश देवरे, काशिनाथ देवरे, भिकचंद देवरे, नंदू देवरे, नितीन बोढरे, दिनेश देसले, माधवराव देवरे, बुधा देवरे, रवींद्र नेरकर, शिवराम शिरसाठ, मधुकर बाविस्कर, निंबाजी खैरनार, नागो ठाकरे, आधार नेरकर, रवींद्र पाटील आदी उपस्थित होते.
रावेर येथे २९ कुटुंबांना देण्यात आला लाभ
शिरपूर - तालुक्यातील आदिवासी भागातील दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांसह इतर महिलांसाठी पंतप्रधान उज्ज्वला योजनेंतर्गत पाच हजार गॅस कनेक्शन मंजूर करण्यात आल्याची माहिती भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष राहुल रंधे यांनी दिली.
पंतप्रधान उज्ज्वला योजनेंतर्गत तालुक्यातील बोराडी येथे गॅस जोडण्यांचे वाटप करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यालयाचे सहसचिव भरत राऊत, पक्षाचे जिल्हाध्यक्ष बबन चौधरी, सरपंच सुरेखा पावरा, सहसिटणीस डॉ. जितेंद्र ठाकूर, युवा मोर्चाचे डॉ. मनोज महाजन, अविनाश गायकवाड, जयेश खैरनार, भरत पावरा, रतन पावरा, शेमल्याचे सरपंच कैलास पावरा, तोंदेचे सरपंच महेश चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद पाटील, जितेंद्र पाटील, कल्याण पाटील, पंचायत समिती सदस्य दिलीप तडवी, रेहमान पावरा, सुखदेव भील, हरी पावरा, विद्या रंधे, वाडीचे सरपंच विठ्ठल चौधरी, सुभाष राजपूत आदी उपस्थित होते.
राहुल रंधे म्हणाले की, आदिवासी भागातील गावे धूरमुक्त करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. त्यासाठी पंतप्रधान उज्ज्वला गॅस जोडणी योजनेतून मोफत गॅस जोडण्या देण्यात येणार आहेत. जिल्ह्यासह आदिवासी भागातील शेतकऱ्यांसाठी सहाशे ऑइल इंजीन मंजूर करण्यात आले आहेत. त्यांचे खासदार डॉ. हीना गावित यांच्या हस्ते लवकरच वाटप होणार आहे. त्याचबरोबर आदिवासी शेतकऱ्यांना एक हजार सिंचन विहिरी मंजूर झाल्या आहेत. आदिवासी भागात सतरा ते अठरा कोटींची कामे मंजूर करण्यात आली आहेत.

बोराडी गाव कॅशलेस करण्याचा संकल्प केला आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ गरजू नागरिकांपर्यंत पोहाेचण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले.
या वेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.
बातम्या आणखी आहेत...