आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Prince Charls Very Carefully Handle Mumbai Dabawala

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रिन्स चाल्र्सने कोहिनूर हिर्‍याप्रमाणे जपून ठेवलाय मुंबईचा डबा अन् टोपी!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - मुंबईच्या फुटपाथवर प्रिन्स चाल्र्स यांनी अलीकडेच आमची भेट घेतली आहे. जेवणाचे डबे वाहतुकीच्या व्यवस्थापनाची माहिती त्यांनी जाणून घेतली होती. एक आठवण म्हणून आम्ही त्यांना गांधी टोपी अन् एक डबा भेट दिला होता. त्यांनी या दोन्ही वस्तू त्यांच्याकडे कोहिनूर हिरा जेथे ठेवला आहे, त्याच्या शेजारीच ठेवल्या आहेत, असे गुपित मुंबई जेवण डबे वाहतूक मंडळाचे सरचिटणीस गंगाराम तळेकर यांनी येथे उलगडले.

भुसावळच्या कोटेचा महिला महाविद्यालयात शुक्रवारी वार्षिक पारितोषिक वितरण सोहळ्यात त्यांनी संवाद साधला. त्यात ते बोलत होते. ते म्हणाले की, जेवण डबे वाहतुकीचे व्यवस्थापन जाणून घेण्यासाठी देशभरातील विद्यापीठांचे अभ्यासक जेवण डबे वाहतूक मंडळाला भेट देतात. इटली, इंग्लंड, जर्मनी, नायझेरीया अशा देशांमध्ये जाण्याचा योग आला आहे. ‘मुंबईचा डबेवाला’ पुस्तकाच्या प्रकाशनासाठी एकदा प्रकाशन संस्थेने तत्कालीन मंत्री (कै.) विलासराव देशमुखांना बोलावले होते. ‘साहेब तुम्ही वेळेवर यावे, नाही तर डबेवाले वेळ झाला की चालले जातील’ असा निरोप आयोजकांनी विलासरावांना दिला होता. त्यामुळे ते नियोजित वेळेपेक्षा एक मिनिट अगोदर कार्यक्रमस्थळी पोहोचले होते. त्या वेळी भाषणात ते म्हणाले होते की, ‘आजपर्यंत मी कोणत्याच कार्यक्रमाला वेळेवर गेलो नाही. पण; डबेवाल्यांचा कार्यक्रम असल्याने वेळेचे बंधन पाळावेच लागले.’