आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालक, महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य; रशियात खासदार रक्षा खडसेंनी मांडले मत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुक्ताईनगर- भारतात महिला, बालकांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले जाते. दीड लाख ग्रामपंचायतींना ब्राॅडबँडच्या सहाय्याने देशाशी जाेडण्यात येत अाहेे, अशी माहिती रावेर मतदारसंघाच्या खासदार रक्षा खडसे यांनी दिली. रशियात सेंट पीटर्सबर्ग येथे १३७वी इंटर पार्लमेंट युनियनची एशिया पॅसिफिक ग्रुपची बैठक सुरू अाहे, त्यात त्या बाेलत हाेत्या. 

खासदार खडसे यांनी या बैठकीत जे मुद्दे मांडले, त्याची माहिती भ्रमणध्वनीवरून दिली. भारतात डिजिटल इंडिया कार्यक्रम राबवताना माय गव्हर्नमेंट प्लेटफाॅर्म, जीवन प्रमाण आणि ग्रामीण क्षेत्रात वायफाय, हॉट स्पॉट ई-गव्हर्नन्स प्रोजेक्ट राबवले जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील जन-धन योजना, आधार आणि मोबाइल बँकिंगमुळे स्त्रिया मुलींना त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी मिळणारे लाभ त्यांच्या बँक खात्यात जमा होत आहेत. महिला उद्योजकांच्या वस्तू, सेवा पुरवण्यासाठी अमेझॉनसारख्या ई-कॉमर्स वेबसाईटशी ‘महिला हट’ ही ऑनलाईन मार्केटिंग सेवा सुरू करण्याविषयी बोलणी सुरू आहे. 

मानवी तस्करी रोखण्यासाठी पथक 
मानवी तस्करी रोखण्यासाठी मानवी तस्करी विरोधी पथके तयार आहेत. ही पथके मानवी तस्करीच्या गुन्ह्याचा तपास करतील. या अनुषंगाने सरकारने ‘उज्ज्वला’ योजना सुरू केली. त्यात लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या शोषितांचे प्रतिबंध, बचाव, पुनर्वसन, पुनः एकीकरण किंवा प्रत्यवर्तन करता येऊ शकते. ऑनलाइन उत्पीडन रोखण्यासाठी तक्रार करण्यासाठी complaint-mwcd@gov.in हा मेल आयडी जारी केला आहे. 
बातम्या आणखी आहेत...