आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासगी रुग्णवाहिकांसाठी सिव्हिल झाले ‘पार्किंग झोन’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आवारात सध्या खासगी रुग्णवाहिकांची प्रमाणापेक्षा जास्त गर्दी होत आहे. काही काम नसाताना देखील येथे अनधिकृतपणे रुग्णवाहिका पार्किंग केल्या जात आहेत. परिणामी रुग्णांचे नातेवाईक आपली वाहने रस्त्यातच लावत असल्याने प्रवेशद्वाराजवळील परिसर वाहनांनी व्यापलेला असतो. त्यामुळे अनेक वेळा गंभीर रुग्णांना रुग्णालयात आणण्यास रुग्णवाहिका वा इतर वाहनांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
‘सिव्हिल’चे पार्किंग कायमच फुल्ल
सिव्हिलमध्ये पार्किंग कायमच भरलेले असते. यात निम्म्यापेक्षा जास्त रुग्णवाहिका असतात. वास्तविक रुग्णाला दाखल केल्यानंतर लगेच या वाहिका रुग्णालयाच्या परिसरातून जायला हव्यात; मात्र तसे न होता पार्किंगमध्येच नऊ ते दहा रुग्णवाहिका कायम येथे पार्क केलेल्या असतात. त्यामुळे अनेकवेळा अपघात विभागात रुग्णांना घेऊन जाण्यास ही अडचणी येतात.
कर्मचार्‍यांचे साटेलोटे
रुग्णवाहिका आणि जिल्हा रुग्णालयाचे कर्मचारी यांच्यात साटेलोटे आहे. एखादा रुग्ण खासगी रुग्णालयात किंवा मृत झालेला रुग्ण घेऊन जाण्यासाठी कर्मचारीच बळजबरीने रुग्णवाहिका ठरवून देतात. या व्यवहारात कर्मचार्‍यांनाही पैसे मिळत असल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाइकांनी केला.