आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Private School Free Admission Issue Closed Before Tenth June

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

10 जूनपर्यंत पूर्ण करा मोफत प्रवेश ; शासनाचे शिक्षण विभागाला आदेश

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - खासगी विनाअनुदानित शाळांमधील 25 टक्के जागांवर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलांना मोफत प्रवेश देण्यात येणार आहे. या निर्णयाचा अंगणवाडी व पहिलीत प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांना लाभ होईल. ही प्रक्रिया 10 जूनपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे शिक्षणाधिकारी कार्यालयातर्फे प्रवेशप्रक्रियेसंदर्भात कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 अंतर्गत आर्थिक दुर्बल घटकातील बालकांना विनाअनुदानित शाळांमध्ये मोफत प्रवेश देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला होता. आर्थिक दुर्बल घटकासाठी राखीव असलेल्या जागांपैकी 50 टक्के जागा ह्या अनुसूचित जाती- जमाती राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतर्गत ज्या पालकांचे उत्पन्न एक लाखापेक्षा कमी आहे, त्यांच्या पाल्यांसाठी हा अध्यादेश फायद्याचा ठरणार आहे.

वंचितांना मिळेल संधी - जिल्ह्यात या वर्षी पहिलीत प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या 44 हजार 280 एवढी आहे. नवीन सुधारित अध्यादेशानुसार दारिद्रय़रेषेखालील नऊ हजार 957 मुलांना तसेच अनुसूचित जातीच्या दोन हजार 772,अनुसूचित जमातीच्या 19 हजार 490 मुलांना या योजनेचा लाभ मिळेल.
94 शाळा विनाअनुदानित - पहिली ते पाचवीपर्यंतचे शिक्षण देणार्‍या शाळांची संख्या एक हजार 491 आहे. त्यात शासकीय शाळा एक हजार 150, अनुदानित खासगी शाळा 267, मान्यताप्राप्त विनाअनुदानित मराठी माध्यमाच्या प्राथमिक शाळा 94 तर इंग्रजी माध्यमाच्या 44 शाळा आहेत. खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये कायद्याप्रमाणे 25 टक्के राखीव जागांवर प्रवेश देण्यात येणार आहे. या कायद्यातून 17 अल्पसंख्याक शाळांना सूट देण्यात आली असल्याची माहिती शिक्षण विभागातर्फे देण्यात आली.
आज होणार बैठक - नव्या कायद्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश शिक्षणाधिकार्‍यांना प्राप्त झाले आहेत. योजनेच्या अंमलबजावणीचा वरिष्ठ अधिकार्‍यांनी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेतला. जिल्ह्यात कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी उद्या गुरुवारी गटशिक्षणाधिकार्‍यांची बैठक होणार आहे. ज्या शाळांमध्ये प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्या शाळांमध्ये पुनप्र्रवेशप्रक्रिया राबवली जाणार आहे. शाळांना 10 जूनपर्यंत आरक्षित जागेवर विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन यादी जाहीर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.