आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Private Schools Recognition, Latest News In Divay Marathi

644 खासगी शाळांची मान्यतेबाबत टाळाटाळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- मोफत सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यानुसार खासगी माध्यमाच्या प्राथमिक आणि माध्यमिकच्या 644 शाळांनी अद्यापही मान्यता घेतलेली नाही. त्यामुळे मान्यता न घेणार्‍या शाळांच्या अनुदानासह इतर सुविधा बंद केल्या जाणार आहेत.
आरटीई निकषाप्रमाणे यापुढे दर तीन वर्षांनी प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या शाळांना प्राथमिक शिक्षण विभागाची मान्यता घ्यावी लागणार आहे. गेल्या सहा महिन्यांपासून शाळांमधील भौतिक सुविधांसह नियोजित 10 कलमांच्या आधारे तपासणी करून शाळांना मान्यता देण्यात येत आहे. आतापर्यंत शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे शाळांनी दाखल केलेल्या प्रस्तावांची समितीने तपासणी करून 392 शाळांना मान्यता दिली आहे. मात्र, अजूनही 644 शाळांना मान्यता देण्याचे काम राहिले आहे. यात प्राथमिक विभागाच्या 147 आणि माध्यमिक विभागाच्या 407 शाळांचा समावेश आहे. तसेच प्राथमिक विभागाच्या 384 शाळांपैकी 237 शाळांना मान्यता देण्यात आली आहे. तर 147 शाळांनी अजूनही मान्यता घेतलेली नाही. माध्यमिक विभागाच्या 652 पैकी 245 शाळांना मान्यता मिळाली. तर 407 शाळा अजून मान्यतेपासून वंचित आहेत. वारंवार सूचना देऊनही या शाळांनी प्रस्ताव दाखल केलेले नाहीत. परिणामी, या शाळांचे अनुदान व शासनाकडून मिळणार्‍या सुविधा बंद करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.