आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खासगी ट्रॅव्हल्सची शहरात पुन्हा घुसखाेरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - शहरात खासगी ट्रॅव्हल्समुळे जिल्हा क्रीडा संकुल, रेल्वेस्थानक परिसरात वाहतुकीचा खाेळंबा दूर करण्यासाठी जिल्हा पाेलिस अधीक्षकांनी शहरात ट्रॅव्हल्सला येण्यास बंदीची अधिसूचना काढली हाेती. तसेच नेरीनाका स्मशानभूमीजवळ ट्रॅव्हलसाठी नवीन थांबा तयार केला अाहे. असे असतानाही अाता पुन्हा शहरात ट्रॅव्हल्सची घुसखाेरी सुरू झाली अाहे.

जिल्हा क्रीडा संकुल परिसरात तसेच रेल्वेस्थानक परिसरात ट्रॅव्हल्स एजन्सीचे कार्यालय अाहेत. त्यामुळे पूर्वी सकाळी ते १० अाणि सायंकाळी ते १० वाजेच्या सुमारास क्रीडा संकुल अाणि रेल्वेस्थानक परिसरात ट्रॅव्हल्सची माेठ्या प्रमाणात गर्दी हाेत हाेती. त्यामुळे पाेलिस अधीक्षक डाॅ. जालिंदर सुपेकर अाणि शहर वाहतूक शाखेचे तत्कालीन निरीक्षक चंद्रकांत सराेदे यांनी काही ट्रॅव्हल्सचालकांच्या मदतीने नेरीनाका स्मशानभूमीच्या बाजूला विठ्ठल मंदिर संस्थानच्या जागेवर ट्रॅव्हल्सचा थांबा तयार केला. मात्र, तरीही काही ट्रॅव्हल्समालक शहरात बस अाणण्यावर ठाम हाेते. त्यामुळे जिल्हा पाेलिस अधीक्षक डाॅ. सुपेकर यांनी नाेव्हेंबर २०१५मध्ये अधिसूचना जारी करून शहरातील अाकाशवाणी चाैक ते रेल्वेस्थानक अाणि रेल्वेस्थानक ते नेरीनाका चाैकापर्यंत खासगी ट्रॅव्हल्सला शहर वाहतूक शाखेतर्फे बंदी करण्यात अाली हाेती. त्यावर ट्रॅव्हल्समालकांनी हरकती घेतल्या. काही ट्रॅव्हल्समालक, चालक न्यायालयातही गेले हाेते. फेब्रुवारी महिन्यात जिल्हा पाेलिस अधीक्षकांनी पुन्हा अधिसूचना जारी करून शहरात ट्रॅव्हल्सला बंदीचे अादेश दिले. काही दिवस ट्रॅव्हल्सचालकांनी शहराबाहेर बस लावल्या. मात्र, काही ट्रॅव्हल्सचालकांनी पुन्हा शहरात घुसखाेरी करण्यास सुरुवात केली असून त्यांनी पाेलिस अधीक्षकांच्या अादेशाला एक प्रकारे केराची टाेपली दाखवली अाहे.

अधिसूचनेचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई
ट्रॅव्हल्सला शहरात येण्यास बंदीची अधिसूचना जारी करण्यात अाली अाहे. या अधिसूचनेचे उल्लंघन करणाऱ्या ट्रॅव्हल्सचालकांवर कारवाई केली जाईल. त्यासाठी स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नेमणूक करणार अाहाेत. अनिल देशमुख, पाेलिस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा
बातम्या आणखी आहेत...