आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासगी वाहनांवर पोलिस दलाच्या लोगोचे स्टिकर; तरीही कानाडाेळा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव; कायद्याचे आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे काम पोलिस दलाचे अाहे. मात्र, पोलिसच कायद्याचे उल्लंघन करीत असतील, तर त्यांच्यावर कारवाई करणार काेण? खासगी वाहनांवर "पोलिस' असे लिहिलेले तसेच पोलिस दलाचा लोगो असलेले स्टिकर लावण्यास गृहविभागाने प्रतिबंध घातला असतानाही जिल्ह्यात पोलिस कर्मचाऱ्यांकडून या नियमाचे उल्लंघन केले जात असल्याची वस्तुस्थिती आहे. या प्रकारामुळे पोलिसांनी गृहविभागाच्या परिपत्रकाला केराची टोपली दाखवली असल्याचे चित्र आहे.

नियमांचे उल्लंघन करून वाहन चालवणाऱ्या चालकांना शिस्त लागावी, यासाठी वाहतूक पोलिस कारवाई करतात. मात्र, जिल्ह्यातील बहुतांश पोलिसांच्या खासगी वाहनांच्या नंबर प्लेट मात्र फॅन्सी असल्याचे दिसून येत आहे. एवढेच नव्हे, तर अनेक पोलिसांच्या खासगी वाहनांवर पोलिस दलाचे चिन्ह असलेले स्टिकर लावलेले तसेच "पोलिस' नावाचे स्टिकर आढळून येत आहे. वाहनावर पोलिस दलाचा लोगो असलेले स्टिकर लावणे नियमबाह्य असल्याचे पत्रक गृहविभागाने सप्टेंबर २०१५ रोजी काढले आहे. हे परिपत्रक सर्वच पोलिस अधीक्षकांना पाठवले आहे. सूचनांचे पालन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, असेही त्यात नमूद आहे. मात्र, या एकाही पोलिस ठाण्याकडून अंमलबजावणी होत नसल्याची स्थिती आहे.

फॅन्सी नंबरवर कारवाई
दुचाकीकिंवा चारचाकी वाहनांची नंबर प्लेट नियमाप्रमाणे नसेल, तर वाहनचालकांकडून पोलिस दंड वसूल करतात. दुसरीकडे मात्र पोलिसांच्या वाहनांनर फॅन्सी नंबर आहेत. याशिवाय पासिंग केलेल्या वाहनांचाही वापर काही पोलिसांकडून केला जात आहे. मात्र, कोणतीही कारवाई केली जात नाही.

अंमलबजावणी नाही
"पोलिस' लिहिलेले आणि पोलिस दलाचा लोगो असलेले स्टिकर लावण्याबद्दल गृहविभागाचे परिपत्रक प्रत्येक पोलिस ठाण्यास पाठवले आहे. परंतु, वरिष्ठांंकडून या बाबत अंमलबजावणी होत नसल्याचे दिसते.

खासगी वाहनांवरही "पोलिस'
पोलिस दलाचा लोगो असलेले स्टिकर केवळ पोलिसच त्यांच्या वाहनांवर लावतात असे नाही, तर अनेक जण त्यांच्या खासगी वाहनांवर "पोलिस' लिहितात अनेकांच्या वाहनांवर पोलिस दलाच्या लोगोचे स्टिकर लावलेले असते. मात्र, याबाबत पोलिसांना गांभीर्य नसल्याचे दिसत आहे.

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना शिक्षा
शहरात फॅन्सीनंबर प्लेट असलेल्या गाड्यांच्या चालकांवर कारवाईची माेहीम सुरू अाहे. पाेलिसांच्या वाहनांवर फॅन्सी नंबर लाेगाेचे स्टिकर लावलेले असेल, तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई हाेणार. चंद्रकांत सराेदे, पाेलिसनिरीक्षक, शहर वाहतूक विभाग
बातम्या आणखी आहेत...