आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झाकण्याच्या प्रयत्नातच राष्ट्रवादीची गटबाजी उघड

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- निवडणूक असूनही राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये चैतन्य नाही. प्रमुख पदाधिकारी एकत्र येण्यास इच्छुक नसल्याची स्थिती वृत्तपत्रातून पुढे येताच, राष्ट्रवादीच्या महानगर व जिल्हाध्यक्षांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली. इच्छुकांचा प्रचंड प्रतिसाद असल्याने बंडखोरी होण्याचा धोका असल्याने प्रक्रिया लांबविल्याचा दावा त्यांनी केला. प्रत्यक्षात पत्रकार परिषदेबाबत दुसर्‍या गटाच्या एकाही पदाधिकार्‍याला माहिती नसल्याने तेथेच गटबाजी उघड झाली आणि पक्षातील निरुत्साहाचे खरे कारण पुढे आले.

गुलाबराव देवकर यांचे मंत्रिपद गेल्यानंतर महापालिका निवडणुकीत पक्षात निरुत्साहाचे वातावरण निर्माण झाले. त्यावर पडदा टाकण्यासाठी अर्ज विक्रीचा फंडा वापरण्यात आला होता. अर्ज वितरणाने काही काळ तारल्यानंतर गटबाजी पुन्हा उघडी झाली. त्यावर पांघरुण घालण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेने वेगळेच चित्र समोर आले. माजी-माजी पदाधिकारी, आमदार, पालकमंत्री यांना माहीत नव्हते. बंडखोरी होण्याची शक्यता इतर पदाधिकार्‍यांनी फेटाळून लावली. तर पुढील आठवड्यात निरीक्षकांची बैठक घेऊन महिना अखेरीस उमेदारी जाहीर करू, असा दावा महानगर व जिल्हाध्यक्षांनी केला आहे.

भाजपसोबत मुळीच नाही
आघाडी समविचारी पक्षासोबतच होईल. वरिष्ठ काय निर्णय घेतील हे माहीत नाही; परंतु मी भाजपसोबत मुळीच जाणार नाही. कॉँग्रेससोबत जाण्यास हरकत नाही. जिल्ह्यात आम्ही मोठे असल्याने आधी त्यांनी निमंत्रण द्यावे, अशी भूमिका जिल्हाध्यक्ष मलिक यांनी मांडली.

खासदार जैन यांना निमंत्रण देऊ
पक्ष म्हणून निवडणूक लढविणार असल्याने आजी-माजी पदाधिकार्‍यांसोबत विद्यमान खासदार ईश्वरलाल जैन यांनाही निमंत्रण देऊ, प्रत्येक बैठकीला त्यांनाही बोलविणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.

रमेश जैन यांनी वाटोळे केले
जळगावचे सिंगापूर करायला निघालेल्या रमेश जैन यांनी शहराचे वाटोळे केले. ठेकेदारांचे खिसे भरण्याचेच त्यांनी काम केले आहे. र्मजीतील ठेकेदारांवर पैशांची उधळण केल्याचा आरोप मनोज चौधरी यांनी या वेळी केला. पत्रकार परिषदेला युवक जिल्हाध्यक्ष रमेश पाटील, नीलेश पाटील, सलिम इनामदार उपस्थित होते.