आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अनधिकृत बांधकाम नियमित करण्याच्या हालचाली, महापालिका काढणार सूचना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - शासनाने २०१५ पूर्वीच्या अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचा निर्णय घेतला अाहे. त्या दृष्टीने जळगाव महापालिकेनेही हालचाली सुरू केल्या असून अाठवडाभरानंतर प्रत्यक्षात कार्यवाही सुरू केल्या जाण्याची शक्यता अाहे. त्यापूर्वी नागरिकांच्या साेयीसाठी सूचना माहिती जाहीर करण्यात येणार अाहे. 

 

राज्यभरात अनधिकृत बांधकामांचा माेठा प्रश्न निर्माण झाला अाहे. त्यामुळे शासनाने अाॅक्टाेबर २०१७ राेजी अादेश काढून अशी बांधकाम नियमित करण्यासंदर्भात काही नियम अटी जाहीर केल्या अाहेत. यासंदर्भात नगररचना विभागामार्फत अादेशाचा बारीक अभ्यास करण्यात येत अाहे. अनधिकृत बांधकामे नियमित करताना जळगाव शहराची भाैगाेलिक परिस्थिती अनधिकृत बांधकामांची वस्तुस्थिती याची माहिती घेतली जात अाहे. यात काेणत्या बांधकामांना नियमित करता येईल याची यादी तयार केली जाणार असून नागरिकांचा गाेंधळ कमी करण्याच्या दृष्टीने सुस्पष्ट अर्ज तयार करण्यात येत अाहे. ताे अर्ज पालिकेच्या संकेतस्थळावर अपलाेड करून संपूर्ण शंकांचे निरसन केले जाणार असल्याचे सहायक संचालक एस.एस.फडणीस यांनी सांगितले. 

 

अर्जासाेबत छाननी शुल्क अाकारणार 
२०१५ पूर्वीचे अनधिकृत बांधकाम नियमित करण्यासाठी पालिकेत अर्ज केल्यानंतर एकूण बांधकाम क्षेत्रफळाच्या (निवासाकरिता) रुपये चाैरस मीटर दराने वाणिज्यकरिता रुपये प्रतिचाैरस मीटर दराने छाननी शुल्काची अाकारणी केली जाण्याची शक्यता अाहे. छाननी शुल्कासंदर्भात अंतिम निर्णय झाला नसला तरी लवकरच दर निश्चित केले जातील. 

 

या प्रकारातील बांधकामे अशक्य 
महापालिकाक्षेत्रातील रेडझाेन, बफर झाेन, ग्रीन झाेन, नदी (ब्ल्यू लाईन), डाेंगर उतारावरील, धाेकादायक बांधकामे जानेवारी २०१६ नंतर बांधलेली वा पूर्ण झालेली बांधकामे नियमित हाेणार नाहीत. जळगावशी निगडीत काेणत्या भागांचा समावेश करता येईल याचा शाेध घेतला जात अाहे. 

 

यांना संधी 
रहिवासीझाेन, वाणिज्य झाेन, अाैद्याेगिक झाेन, अारक्षणास पर्यायी जागा नियमानुसार दिल्यास अारक्षणामधील ( गार्डन, प्ले ग्राउंड, अाेपन स्पे अारक्षणे वगळून) नियमानुसार रस्त्यास पर्यायी रस्ता दिल्यास विकास अाराखड्यातील रस्त्यातील बांधकामे नियमिती करता येणार अाहे. 

 

साईड मार्जिन गरजेचे : गावठाणसाठी किमान ४.५ मीटर बिगरगावठाणसाठी किमान मीटर रस्त्यांची रूंदी गरजेची अाहे. तसेच १५ मीटरपर्यंत (५ मजले) मात्र त्यापुढील ३६ मीटरपर्यंत (१२ मजले) अग्निशामक विभागाच्या नाहरकत दाखल्यानंतर अशा उंच इमारती नियमित हाेऊ शकतील. तर १० मीटर उंचीपर्यंतच्या सर्व बाजूनी किमान ०.७५ मीटर, १० ते २४ मीटर उंचीपर्यंत विकास नियंत्रण नियमावलीपेक्षा ५० टक्के मार्जिन पुरसेे असेल. 

बातम्या आणखी आहेत...